अंतिम अथवा प्रारूप मतदारयाद्या 7 जूनपर्यंत प्रसिद्ध केलेल्या 27 हजार 64 सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 9 ऑक्टोबरपासून निवडणुकांच्या प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जारी केले आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या 28 जून 2023 रोजीच्या आदेशान्वये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 9 ऑक्टोबर 2023 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी कळवले आहे. ( Big News Co Operative Societies Elections In Maharashtra Announced )
निवडणूकांकरीता प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या दिनांक 7 जून 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्या टप्प्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूकीकरीता 8 जून ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांकरीता 1 ऑक्टोबर 2023 या अर्हता दिनांकावर नव्याने प्रारूप मतदार याद्या तयार करावयाच्या आहेत.
ज्या प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणूकांकरीता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत, अशा प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणूकांकरीता प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार अर्हता दिनांकाबाबतचे प्रस्ताव कारणमिमांसा नमुद करून प्राधिकरणास सादर करणे आवश्यक आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संघीय संस्थांच्या निवडणूकांकरीता सभासद संस्थांनी प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले असल्यास पुन्हा ठराव मागविण्याची आवश्यकता नाही. तथापि महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 चे नियम 10 (4) मध्ये नमुद केलेल्या परिस्थितीत बदल करण्याची मुभा असलेले बदल जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी स्विकारावेत. नवीन अर्हता दिनांकामुळे सभासद संस्था, नव्याने पात्र होत असल्यास अशा संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्ती ठराव मागविण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी करावी, असेही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून कळविले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील 19 गावांच्या सार्वत्रिक आणि 10 गावांच्या पोटनिवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; वाचा 29 ग्रामपंचायतींची यादी
– अजितदादांनी बाजी मारली! उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीपदानंतर पुण्याचे पालकमंत्री पदही ताब्यात, चंद्रकांतदादा ‘या’ जिल्ह्याचे पालक
– ‘मावळ तालुक्यात पावसाळ्यामुळे बंद असलेली विकासकामे लवकर सुरु करण्यात यावी’ – आमदार सुनिल शेळके