वडगाव नगरपंचायत हद्दीत श्री पोटोबा महाराज देवस्थान उत्सव समिती अध्यक्ष संजय सजन दंडेल यांच्या वाढदिवसानिमित्त 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, पत्रकार विजय सुराणा, गणेश विनोदे आदींनी शाब्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, माजी नगरसेवक चंद्रजित वाघमारे, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, पत्रकार विजय सुराणा, गणेश विनोदे, व्याख्याते विवेक गुरव, शरद ढोरे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब तुमकर, उमेश ढोरे, शिवाजी येळवंडे, गणेश ढोरे सोमनाथ आगळे, रवी साबळे व बहुसंख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्याख्याते विवेक गुरव यांनी केले. आभार बाळासाहेब तुमकर यांनी मानले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“समाजात जगत असताना आपण समाजाचं देणं लागतो, सामाजिक बांधिलकीतुन आरोग्य कर्मचारी हे आपल्या घराचा परिसर स्वच्छ करतात. त्यामुळे आपले आरोग्य तंदुरुस्त राहते. त्यांच्या प्रति आदर म्हणून कपडे वाटप करताना आनंद वाटतो.” – संजय दंडेल
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अजितदादांनी बाजी मारली! उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीपदानंतर पुण्याचे पालकमंत्री पदही ताब्यात, चंद्रकांतदादा ‘या’ जिल्ह्याचे पालक
– ‘मावळ तालुक्यात पावसाळ्यामुळे बंद असलेली विकासकामे लवकर सुरु करण्यात यावी’ – आमदार सुनिल शेळके
– डीजेच्या लेझर लाईटमुळे तरूणाच्या डोळ्याची दृष्टी अधू; पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीतील घटना