व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात वडगाव शहर भाजपाचा सक्रीय सहभाग; 7 टन कचरा संकलित

आजी माजी पदाधिकारी , कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी हिरीरीने सहभागी; लोकसहभागातून 7 टन कचरा संकलित

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 4, 2023
in लोकल, शहर
Swachhta-Hi-Seva

Photo Courtesy : Team Dainik Maval


केंद्र व राज्य सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वच्छता पंधरावडा निमित्त महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला आयोजित ‘एक हात एक साथ स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत लोक सहभागातून वडगाव शहरात सात टन कचरा संकलित करण्यात आला. ( 7 tonnes of garbage was collected in Vadgaon city in Swachhta Hi Seva Abhiyan )

वडगाव नगरपंचायत च्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहर भाजपा यांनी शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली यात प्रामुख्याने पंचायत समिती चौक, वडगाव रेल्वे स्टेशन, महादजी शिंदे उद्यान, शहरातील मुख्य रस्ता, महालक्ष्मी मंदिर केशवनगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवनगर या भागात स्वच्छता श्रमदान करण्यात आले.

यावेळी वडगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, भाजपा वडगांव शहराध्यक्ष अनंता कुडे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, दिनेश ढोरे, माजी नगरसेवक प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळस्कर, किरण म्हाळस्कर, संपत म्हाळस्कर, रविंद्र काकडे, शंकर भोंडवे, माजी सरपंच संभाजी म्हाळस्कर, किरण भिलारे, दीपक भालेराव, योगेश म्हाळस्कर, शरद मोरे, अमोल ठोंबरे, अतुल म्हाळस्कर, उद्योजक गणेश भेगडे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

माजी सभापती गुलाब म्हाळस्कर यांनी यावेळी बोलताना, ‘कचऱ्याचे वर्गीकरण करावे व कचरा गाडीतच टाकावा जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील,’ असे आवाहन केले. तसेच महात्मा गांधी यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल सर्व नागरिक व नगरपंचायत प्रशासनाचे हार्दिक आभार मानण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मावळ तालुक्यात पावसाळ्यामुळे बंद असलेली विकासकामे लवकर सुरु करण्यात यावी’ – आमदार सुनिल शेळके
– डीजेच्या लेझर लाईटमुळे तरूणाच्या डोळ्याची दृष्टी अधू; पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीतील घटना
– ‘जे घरात बसलेत त्यांनी शहरवासीयांना उत्तर द्यावं’, तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांवरुन ‘आण्णांचा’ ‘आप्पांवर’ हल्लाबोल


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील 19 गावांच्या सार्वत्रिक आणि 10 गावांच्या पोटनिवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; वाचा 29 ग्रामपंचायतींची यादी

Next Post

स्तुत्य उपक्रम! वाढदिवसानिमित्त 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना कपडे वाटप । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Clothes-distributed

स्तुत्य उपक्रम! वाढदिवसानिमित्त 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना कपडे वाटप । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.