भाऊबीज निमित्त निराधार आणि वंचित महिला भगिनीसाठी अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेने केलेल्या आवाहनाला श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसहभागतून 500 साडी, 75 लहान मुलांचे नवीन ड्रेस आणि 25000 रुपये देणगी देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनी भावूक झालेल्या दिसून आल्या. कारण समाजाकडून अत्यंत प्रेम जिव्हाळ्याने आलेली ही साडीची भेट आमच्या जगण्यासाठी नव प्रेरणा नवआशा आणि नव उमेद देणारी आहे, याच भावना त्यांच्या प्रत्येकाच्या अंतकरणात दाटून आल्या होत्या. ( Help to Snehalaya NGO Ahmednagar Through Abhang Pratisthan Shri Kshetra Dehu )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्नेहालय संस्थेचे प्रमुख आदरणीय समाजसेवक डॉ. गिरीश कुलकर्णी सर यांनी स्वतः अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांसमवेत पूर्ण दिवसभर सर्व संस्थांची भेट देऊन सर्व माहिती सांगितली. अभंग प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करीत मनापासून सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी स्नेहालय परिवाराचे सदस्य किरीटी मोरे सर व मिरेन गायकवाड यांनीही स्नेहालय संस्थेच्या आजपर्यंतच्या 33 वर्षांच्या सामाजिक कार्याची, विविध सेवाभावी प्रकल्पांची माहिती दिली. अभंग प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांसाठी स्नेहालयाची ही भेट सामाजिक कार्याचा नवा दृष्टिकोन विकसित करणारी व जीवनाचा अर्थ नव्याने उलगडून दाखवणारी होती हे निश्चित.
अधिक वाचा –
– पवनमावळमधील मोरवे शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला टोपली विणकामाचा अनुभव
– ‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग