मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) आंदर मावळ विभागातील ( Andar Maval ) मौजे कुसूर ( Kusur ) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसुरघाट व्हावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्हा पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे यासाठी भाजपा विद्यार्थी आघाडी व मावळ अँडव्हेंचर चॅरिटेबल ट्रस्ट यांसह समस्त ग्रामस्थ मंडळी कुसुर आणि आंदर मावळ येथील ग्रामस्थ यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. ( Letter To Minister Chandrakant Patil For Kusur Ghat Road Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुरातन असून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात प्रामुख्याने त्याचा वापर दळणवळणासाठी होत होता. स्वराज्याच्या उत्थानासाठी सुरत वरुन आणलेले धन हे ऐतिहासिक कुसूर घाटाने वर आणले गेले त्यातिल एक भाग पुण्याकडे गेला आणी दुसरा भाग लोहगडावरील लक्ष्मी कोठीमधे ठेवला गेला होता.
थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी याच घाटाने वर येउन किवळे पठारावर ब्रिटिशांनी युद्ध केले कालांतराने रस्त्याचे दळनवळन थांबुन मावळ व कोकणचा संबंध तुटला आज अंदरमावळातील ग्रामस्थांना कोकणात जायचे असेल तर शंभर किलोमीटरचा वेढा घालुन जावे लागते शेतीमाल बाजार पेठ पुणे स्थित शंभर किलोमीटर वर आहे पण कोकण ते मावळ यांना जोडणारा हा ऐतिहासिक कसूर घाट रस्ता या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.हा रस्ता झाला तर मावळातील शेतकरी कमी वेळ व मोजक्याच प्रवास खर्चात कर्जत बाजारपेठेत आपला शेतमाल नेहुलकर शकतील व शेतकर्यांना सुगीचे दिवस येतील अंदर मावळातील कुसुरगाव ते रायगड जिल्ह्यातील (कोकण) भिवपुरी हा सदर रस्ता दुरुस्त झाल्यास अंदर मावळ भागातीलच नव्हे तर संपूर्ण मावळ तालुक्यातील नागरिकांना रोजगार प्राप्त होऊन विकासाला चालना मिळेल.
हेही वाचा –पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान 5 एकर करावी, मावळमधील शेतकऱ्यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी
कान्हे फाटा ते खांडी कुसुर रोड पासून आल्यानंतर भिवपुरी रायगड जिल्हा (कोकण) यामधील पायी प्रवासाचे अंतर हे फक्त अर्ध्या तासाचे (30 मिनिट ते 40 मिनिट) आहे या कारणांमुळे पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात होत असणाऱ्या वाहतूक कोंडीस आळा बसू शकतो व वाहतूक कोंडी नियंत्रणात येऊ शकते व महामार्गावर रोज-दररोज होत असणाऱ्या अपघातांना पूर्णविराम बसू शकतो. यासाठी मावळ अँडव्हेंचर चॅरिटेबल ट्रस्ट ( Maval Andventure Charitable Trust ) 2007 पासुन सदर ऐतिहासिक कसूर संवर्धन ग्रामस्थ गावकरी यांना घेऊन करत आहेत. या वेळी भाजपा चे कार्यकर्ते व कुसूर संवर्धन ग्रामस्थ गावकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहालय संस्थेला 500 साड्या, लहान मुलांसाठी कपडे आणि 25 हजारांची देणगी
– ‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग