मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन झाले. ‘वर्ष 2036 ला भारतात ऑलिम्पिक चे आयोजन करणे हे देशवासीयांचे स्वप्न आहे. तसेच वर्ष 2029 मधील युथ ऑलिम्पिकच्याही संयोजनास भारत इच्छुक आहे’ असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. ( Prime Minister Narendra Modi addressed 141st International Olympic Committee IOC Session at Mumbai )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रारंभी आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील ग्रँड थिएटर येथे हे अधिवेशन होणार आहे.
“भारतातील गावागावांत विविध खेळांची परंपरा आहे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या खेळांची प्रथा आहे. आमची क्रीडा परंपरा समृद्ध आहे. प्राचीन ग्रंथामध्ये 64 विद्यांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये अश्वारोहण, धनुर्विद्या, जलतरण आणि मल्लविद्या यांचा समावेश आहे.” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
अधिक वाचा –
– मोठी बातमी! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद, वाचा संपूर्ण आदेश
– शिरगाव पोलिसांकडून पवना नदी काठचा दारूअड्डा उध्वस्त; पोलिसांना पाहताच संशयिताने ठोकली धूम
– मावळचे आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानकडून लेक लाडकी योजनेचा शुभारंभ । Vadgaon Maval