लोणावळा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत वलवण येथे दुचाकी चोरी ( Bike Theft ) झाल्याची घटना समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी अवघ्या चार सव्वा चार तासात दुचाकी चोरी गेली आहे. या प्रकरणी फिर्यादी योगेश विलास दुबे (वय 29, रा. वलवण लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे फीर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड संहिता कायदा कलम 379* अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( Lonavala City Police Bike Theft At Valvan Case Filed )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश विलास दुबे यांच्या मालकीची रुपये 15 हजार किमतीची होन्डा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एमएच 14 डिके 5158) त्यांच्या घरासमोरील पार्किंगमधून दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री पाऊणेबारा ते ते दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान चोरी गेली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक डुबल साहेब यांच्या आदेशान्वये सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार मडके हे करीत आहेत.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात विवाहितेचा छळ; पती, सासूसह 5 जणांवर गंभीर आरोप, गुन्हा दाखल I Lonavla City Crime
– पुण्यश्री योजनेंतर्गत मावळमधील वडेश्वर येथील बचत गटाच्या विक्री केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन
– श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहालय संस्थेला 500 साड्या, लहान मुलांसाठी कपडे आणि 25 हजारांची देणगी