मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ऊस गाळप हंगामासाठी गठीत मंत्री समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. या बैठकीत राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून 88.58 लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ( Sugarcane crushing season will start from 1 November Said CM Eknath Shinde )
गेल्या वर्षी राज्यात 211 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून 105 लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन 88.58 लाख मेट्रीक टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला. हंगाम 2022-23 मध्ये साकार उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ उत्तरप्रदेश राज्याचा क्रमांक आहे.
ऊस तोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून 10 रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय झाला. या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतीगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी एफआरपी बाबात समग्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
– पुण्यातील 30 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मावळमधील दोन केंद्रांचा समावेश
– आमदार सुनिल शेळकेंची क्रेझच निराळी! गिर्यारोहकांनी वजीर सुळक्यावर फडकवला वाढदिवसाचा बॅनर । MLA Sunil Shelke Birthday