मावळ तालुक्यात पीएमपीएमएलची बस सेवा निगडी-वडगाव मावळ, निगडी-लोणावळा, निगडी ते टाकवे, निगडी ते नवलाख उंब्रे, निगडी ते उर्से, निगडी ते गहुंजे या मार्गावर चालू असते. त्यातच वडगाव शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, पोलीस ठाणे, विविध शासकीय कार्यालये, बँका, शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग, व्यावसायिक, विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना कामासाठी ये-जा करावी लागते. ( Online Pass Service Launch at Vadgaon Maval PMP Bus Centre )
अनेक कर्मचारी वडगावात राहत असून, तालुक्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी इतर नागरिक बसने प्रवास करत असतात. या सर्वांना सवलतीचा पास घेण्यासाठी निगडी येथे जावे लागत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय व अर्थिक नुकसान होत असल्याने गेल्या वर्षी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने या नवीन पास केंद्राची उभारणी करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या नवरात्र उत्सवाच्या शुभमुहूर्तावर ऑनलाईन पास सेवाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी पीएमपीच्या बस प्रतिनिधी उपस्थित होते. या पास केंद्रामुळे तालुक्यासह वडगावकर नागरिकांचा सवलत पास साठी जाणारा वेळ, अर्थिक नुकसान तसेच गैरसोय थांबली आहे. त्यात ऑनलाईन पास सेवा उपलब्ध झाल्याने या केंद्राचा तालुक्याह वडगाव शहरातील विद्यार्थी, कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक ते सर्वसामान्य जनतेला कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे.
अधिक वाचा –
– नवरात्र आणि भोंडला । ‘जेव्हा महाराष्ट्रात गरबा फक्त गुजराती लोक खेळायचे, तेव्हा मराठी कुटुंबात भोंडला लोकप्रिय होता’
– ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मावळ भाजपाने कसली कंबर! निवडणूक असलेल्या प्रत्येक गावासाठी नेमले प्रभारी, पाहा यादी
– भाविकांसाठी आनंदाची बातमी! कार्ला येथील आई एकविरा देवीचे दर्शन 24 तास सुरु राहणार