मावळ तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. बुधवारी, दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे दुपारपर्यंत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स इथे मोठी धावपळ पाहायला मिळाली. सायंकाळपर्यंत निवडणूका असलेल्या 29 ग्रामपंचायतींचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं होतं. यात नाणे मावळमधील 9 सदस्यीय ग्रामपंचायत असलेली ‘मुंढावरे-वाडीवळे-वळक’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 3 जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरित 6 सदस्य पदासाठी आणि सरपंच पदासाठी निवडणूक लागली आहे. ( Mundhaware Wadiwale Valak Group Gram Panchayat Election 2023 Maval Taluka )
वाडिवळे गाव वॉर्डातील तीनही सदस्य बिनविरोध –
मुंढावरे-वाडीवळे-वळक ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये वाडिवळे गाव अर्थात वॉर्डात 3 जागा आहेत. या तीनही जागा स्थानिकांनी एक विचाराने बिनविरोध काढल्या. वॉर्ड क्रमांक 3 वाडिवळे येथील सर्वसाधारण जागेवर अमोल उल्हास थोरवे हे बिनविरोध निवडून आले आहेत तर, दुसऱ्या सर्वसाधारण जागी रामदास दशरथ थोरवे आणि सर्वसाधारण महिला जागेवर सोनाली मच्छिंद्रनाथ थोरवे बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
6 सदस्य पदासाठी आणि सरपंच पदासाठी निवडणूक रंगणार;
ग्रुप ग्रामपंचायतीच्या पहिल्या वॉर्डात अर्थात मुंढावरे गावात मात्र 3 सदस्य पदासाठी निवडणूक लागली आहे. तिथे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि सर्वसाधारण जागेसाठी अनुक्रमे दुरंगी लढती होणार आहेत. वॉर्ड क्रमांक 2 अर्थात वळकमधील 3 जागांसाठीही निवडणूक होणार असून तिथे सर्वसाधारण महिला 2 जागांसाठी 3 उमेदवार रिंगणात असून सर्वसाधारण 1 जागेसाठी 2 जण रिंगणार आहेत.
तसेच, राखीव ओबीसी महिला सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे तिनही उमेदवार वाडीवळे गावातून आहेत. त्यामुळे सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या वाडीवळेत सरपंच पदासाठी मात्र तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक : छाननीत अर्ज बाद का होतात? ग्रामपंचायत उमेदवारांसाठी अटी आणि पात्रता काय असतात? जाणून घ्या
– ‘मुलीला नोकरी आणि सरकारी योजनेतून 1 कोटी मिळवून देतो’ असे सांगत महिलेची लाखोंची फसवणूक; तळेगावातील धक्कादायक प्रकार
– पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर! लासलगाव आणि बारामती बाजार समितीचा प्रथम क्रमांक