लोणावळा शहर पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी विशाल पाडाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विशाल विकारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदाच्या निवडीसाठी गुरुवारी सायंकाळी शहर पत्रकार संघाची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमुखाने ही निवड जाहीर करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
माजी अध्यक्ष विशाल विकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला माजी अध्यक्ष निखिल कवीश्वर, विशाल पाडाळे, बंडू येवले, प्रशांत पुराणिक, प्रदीप वाडेकर, नितीन तिकोने, संतोषी तोंडे, संजय हुलावळे, दीपक तारे, नरेश बोरकर, मनोज गवळी हे उपस्थित होते. बैठकीत पत्रकार संघाने विशाल विकारी यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत निर्माण झालेला कोविड संघर्षाचा काळ तसेच त्यानंतरच्या काळात केलेल्या दैदीप्यमान कार्याचा आढावा घेतला. तद्नंतर अध्यक्षपदासाठी सर्वानुमते विशाल पाडाळे यांचे एकमेव नाव पुढं आल्याने बैठकीचे अध्यक्ष विशाल विकारी यांनी विशाल पाडाळे यांची एकमताने निवड झाली असल्याचे घोषित केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष विशाल पाडाळे यांनी नूतन कार्यकारणी देखील घोषित केली. यामध्ये;
नितीन तिकोणे (कार्याध्यक्ष)
प्रदीप वाडेकर (उपाध्यक्ष)
प्रशांत पुराणिक (सचिव)
नरेश बोरकर (खजिनदार)
संतोषी तोंडे (सह सचिव)
मनोज गवळी (सह खजिनदार)
यांच्या निवड जाहीर करण्यात आल्या.
विशाल पाडाळे यांची कारकीर्द –
विशाल पाडाळे हे लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक असून विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेत ते कार्यरत आहे. मागील 16 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. त्यांनी दैनिक केसरी पासून पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे दैनिक पुढारी, दैनिक प्रभात यासह TV9, झी24तास या वृतवाहिण्यांसाठी देखील काम केले आहे. यासह सह्याद्री दर्पण, हवापालट, जगावेगळे असे विविध पोर्टल व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते पत्रकारिता करीत असतात. मागील अनेक वर्षांचा त्यांना पत्रकारितेतील अनुभव असल्याने ते नक्कीच पत्रकार संघाला एक नवीन दिशा देतील अशी सर्वांना खात्री आहे. पत्रकार संघातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन संघाची वाटचाल करणार असल्याचे विशाल पाडाळे यांनी यावेळी नमूद केले.
( Vishal Padale elected as President of Lonavla City Journalists Association )
अधिक वाचा –
– बिअर बारचे लायसन्स काढून देतो असे सांगून एकाची 9 लाख 58 हजाराची फसवणूक; गहुंजे गावातील प्रकार
– ‘मुंढावरे-वाडीवळे-वळक’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 3 जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी होणार तिरंगी लढत
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील विविध विकासकामांना प्रारंभ