व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकदम अचूक आकडेवारी! निवडणूका जाहीर झालेल्या मावळातील 29 ग्रामपंचायतींचं अंतिम चित्र काय आहे? लगेच वाचा

ग्रामपंचायत निवडणूक : मावळ तालुक्यातील 19 पैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध; 15 ग्रामपंचायतींची निवडणूक रंगणार

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 28, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Gram-Panchayat-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणूकांमध्ये मावळ तालुक्यातील 29 गावांचा समावेश होता. यात 19 गावांच्या सार्वत्रिक तर पोटनिवडणूका असलेल्या 10 गावांचा समावेश होता. निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दिनांक 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ होती. त्यामुळे 25 तारखेला सायंकाळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचे एकुण चित्र स्पष्ट झाले. यात, मावळ तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर, 15 गावांमध्ये सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात असून सदस्य पदांच्या 117 जागांपैकी 37 जागा बिनविरोध झाल्यामुळे सदस्य पदाच्या 79 जागांसाठी 165 उमेदवार रिंगणात आहे.

तर, पोटनिवडणूका असलेल्या 10 गावांमध्ये शिरगांव आणि पुसाणेच्या सरंपच पदाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर सदस्य पदाच्या पोटनिवडणूकीत नवलाख उंबरेची एक जागा, पुसाणेच्या 7 जागा, सावळा गावची एक जागा, शिवणेच्या 2 जागा अशा सदस्य पदाच्या 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर पोटनिवडणूकीत कान्हे, खांडशी, कुसगाव, चिखलसेच्या प्रत्येकी एक आणि दारुंब्रेच्या 3 जागांसाठी निवडणूक होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सार्वत्रिक निवडणूका जाहीर झालेल्या गावांतील स्थिती :

मावळ तालुक्यात एकूण सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 गावांपैकी 4 गावे ही सरपंच पदासह पुर्णतः बिनविरोध निवड झाली. तर उर्वरित 15 गावांत निवडणूक लागली आहे. या 15 गावांत देखील अनेक गावांतील सदस्य पदाच्या काही जागा या बिनविरोध झाल्या आहेत. ( Maval Taluka Gram Panchayat Election 2023 News and Statistics )

सरपंच पदासह बिनविरोध निवडणूक झालेली गावे –
आढले बुद्रुक, लोहगड, बेबडओहोळ, ओवळे

निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायती

1. साळुंब्रे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 5 जागा बिनविरोध
– 2 जागांसाठी 5 उमेदवार
2. शिळींब –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
3. डोणे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
4. कोंडिवडे आं.मा. –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 6 जागा बिनविरोध
– 1 जागेसाठी 2 उमेदवार
5. सुदुंबरे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 11
– 10 जागा बिनविरोध
– 1 जागा रिक्त
6. कल्हाट –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
7. उधेवाडी –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 5 जागा बिनविरोध
– 2 जागांसाठी 4 उमेदवार
8. मळवंडी ढोरे –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7 सदस्य
– 15 उमेदवार
9. भाजे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 19 उमेदवार
10. सांगिसे –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 2 जागा बिनविरोध
– 5 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात
11. सुदवडी –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
12. जांबवडे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 1 जागा बिनविरोध
– 6 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणार
13. मुंढावरे –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 3 जागा बिनविरोध
– 9 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात
14. दिवड –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 4 जागा बिनविरोध
– 5 जागांसाठी 10 उमेदवार
15. आंबळे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 1 जागा बिनविरोध
– 8 जागांसाठी 17 उमेदवार

एकूण 15 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 अर्ज आले आहेत. यात शिळींब, कोंडिवडे (आं.मा.), उधेवाडी, मळवंडी ढोरे, सांगिसे, मुंढावरे, दिवड या गावांत सरपंच पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तसेच या एकूण 15 ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या एकूण 117 जागांपैकी 37 जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 79 सदस्य पदांच्या जागांसाठी 165 उमेदवार रिंगणात आहेत. ( Maval Taluka Gram Panchayat Election 2023 News and Statistics )

हेही वाचा – ग्रामपंचायत निवडणूक : छाननीत अर्ज बाद का होतात? ग्रामपंचायत उमेदवारांसाठी अटी आणि पात्रता काय असतात? जाणून घ्या

पोटनिवडणूका निवडणूका जाहीर झालेल्या गावांतील स्थिती :

मावळ तालुक्यात 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या होत्या. यात शिरगाव आणि पुसाणे गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक, तर पुसाणेसह कान्हे, खांडशी, कुसगाव, चिखलसे, दारुंब्रे, नवलाख उंब्रे, सावळा, शिवणे गावच्या सदस्य पदाची पोटनिवडणूक होती.

पोटनिवडणूक बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती.,
शिरगाव – सरपंच – बिनविरोध
पुसाणे – सरपंच – बिनविरोध
पुसाणे – सदस्य – 7 जागा – बिनविरोध
नवलाख उंब्रे – सदस्य – 1 जागा – बिनविरोध
सावळा – सदस्य – 1 जागा – बिनविरोध
शिवणे – सदस्य – 2 जागा – बिनविरोध
एकूण सरपंच पदाच्या दोन आणि सदस्य पदाच्या 11 जागा बिनविरोध निवडूण आल्या आहेत.

पोटनिवडणूक असलेल्या आणि निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती.,
कान्हे – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
खांडशी – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
कुसगाव – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
चिखलसे – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
दारुंब्रे – सदस्य संख्या 3 – उमेदवार 9
एकूण 7 सदस्य पदाच्या जागांसाठी एकूण 17 उमेदवार रिंगणात आहेत.

एकंदरीत मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 उमेदवार, सदस्य पदांच्या 86 जागांसाठी 182 उमेदवार असे एकूण 219 उमेदवारांचे भवितव्य दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद होणार आहे.

अधिक वाचा –
– गहूंजे-साळुंब्रे, शिवणे-सडवली, थुगाव-बऊर, कडधे-आर्डव ह्या पुलांची कामे 30 जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश
– तळेगावमधील ‘म्हाडा’ सदनिकाधारकांच्या विविध समस्यांबाबत पुण्यात संयुक्त बैठक; ‘या’ तारखेपर्यंत सर्वांना घराचे ताबे मिळणार
– महत्वाची बातमी! ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा काय आहे आदेश?


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धा; पहिल्यांदाच पुरुषांसह महिलांचेही संघ सहभागी

Next Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील तब्बल 12 कोटींच्या विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
dehu-road-cantonment-board

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील तब्बल 12 कोटींच्या विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
Digital education gets boost through Device for Dreams initiative at Zilla Parishad School in Nigade Maval

मावळमधील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” उपक्रमातून डिजिटल शिक्षणाला चालना !

October 3, 2026
BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.