व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवून लुटमार करणारे तीनजण ताब्यात । Maval Crime

ट्रक चालकाला मारहाण करत त्याला लुटण्याचा प्रकार घडला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 31, 2023
in लोकल, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


रात्रीच्या वेळी रहदारी नसलेल्या रस्त्यावर अडवून लूटमार केली जाते. परंतु मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरच लूटमार झाल्याचा प्रकार घडला आहे. कामशेतच्या हद्दीत रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ट्रक चालकाला अडवून मारहाण करत लुटण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मुंबई- पुणे एक्सेप्रेसवेवर घडलेल्या या धक्कादायक प्रकारात ट्रकवर दगडफेक करत अडवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. शुभम दत्ता होजगे, धिरजी लहु कडू, प्रथमेश जितेंद्र कालेकर या तीन आरोपींना अटक केली आहे.

ट्रक चालकाला मारहाण करत त्याला लुटण्याचा प्रकार घडला होता. 20 ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास बौर गावच्या हद्दीत मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे रोडने मुंबई लेनवरून जात असताना तीन अज्ञात इसमांनी ट्रक अडकून ट्रकच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान केले. दरम्यान गाडीमध्ये चढून तक्रारदार यांना दगडाने डोक्यात मारून दुखापत केली तसेच तक्रार यांचा मुलगा गौरव याला कानाखाली मारून गाडी थांबवून तक्रारदार यांचे ताब्यातील चार हजार पाचशे रूपये रोख, चार हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, चार हजार पाचशे रुपये किंमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण तेरा हजार रुपये किंमतीचा माल जबरीने चोरी करून चोरून नेला होता.

अधिक वाचा –
– जबरदस्त कामगिरी! पुणे जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, एकूण 504 आरोपींना अटक
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील आणखीन एका गावात पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’, ‘आरक्षणाच्या निर्णयाशिवाय कुणी गावात आला तर…’
– Breaking! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्ला तलावात युवकांचे जलसमाधी आंदोलन


dainik maval jahirat

Previous Post

‘मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत’ – मुख्यमंत्री

Next Post

मराठा आरक्षणासाठी मावळ तालुक्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून पदांचे राजीनामे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-reservation

मराठा आरक्षणासाठी मावळ तालुक्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून पदांचे राजीनामे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.