मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब होत असल्याचे कारण देत, तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक पक्षांच्या नेते, पदाधिकारी यांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारले आहे. आतापर्यंत मावळ तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी, काही ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे सादर केले आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावांत मराठा आंदोलनाची धग पोहोचली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते मच्छिंद्र खराडे यांनी सर्वप्रथम आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगांव शहराचे अध्यक्ष अतुल वायकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच, भारतीय जनता पार्टी (कामगार आघाडी) अमोल जगन्नाथ भेगडे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. यासह शंकर मोंढवे, दत्तात्रय पडवळ, अविनाश बधाले यांनीही आपले पदाचे राजीनामे दिले आहेत.
कान्हे ग्रामपंचायत उपसरपंच यांचा राजीनामा –
अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज व पंचक्रोशीतील नागरिकांनी कान्हे फाटा येथे लक्षणीय एक दिवसीय उपोषण करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कान्हेगावच्या उपसरपंच सोनाली सातकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यात आला; तर काही उपोषणकर्त्यांनी मुंडन करत, राज्य सरकारचा निषेध केला.
अधिक वाचा –
– किसान युनियनचा एल्गार! श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर दिनांक 3 नोव्हेंबरला मोर्चा
– जबरदस्त कामगिरी! पुणे जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, एकूण 504 आरोपींना अटक
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील आणखीन एका गावात पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’, ‘आरक्षणाच्या निर्णयाशिवाय कुणी गावात आला तर…’