‘उसाला प्रति टन 3 हजार 300 रुपये भाव मिळावा’, या मागणीसाठी पुणे जिल्हा किसान युनियनच्या वतीने श्री संत तुकाराम साखर कारखान्यावर दिनांक 3 नोव्हेंबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. युनियनचे अध्यक्ष आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे यांनी हि माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“संत तुकाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेसाठी प्रसारित केलेल्या ताळेबंद अहवालामध्ये आठ कोटी रुपये निव्वळ नफा व दोन कोटींची आयकर भरण्यासाठी तरतूद दाखविण्यात आली आहे. वास्तविक, पाहता साखर उत्पादक उद्योगाला आयकर माफ असून साखर कारखान्याला सहवीज प्रकल्पातून देखील 14 कोटी उत्पन्न प्राप्त होत आहे. अशा एकूण 24 कोटींचा हिशोब ताळेबंद अहवालात मांडण्यात आला आहे. तसेच 30 रुपये किलोप्रमाणे अथवा 3 हजार रुपये टनाने साखर विक्री होत असताना साखर कारखाना 2 हजार 634 रुपये एवढाच नाममात्र भाव देत आहे.” असे दाभाडे म्हणाले.
“3 हजार 700 रुपये प्रति टन या भावाने दोन लाख टन साखर विक्री केल्याने एकूण 14 कोटी रुपये अधिकचे प्राप्त होतात, असे एकूण 38 कोटी रुपये अतिरिक्त प्रमाणात साखर कारखान्याकडे जमा होतात. तसेच मागील बारा वर्षांचे दोनशे रुपये प्रत्येक टनाला कारखान्याकडून शेतकऱ्यांना येणे आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना 3 हजार 300 रुपये प्रति टन भाव मान्य करून दिवाळीपूर्वी रक्कम अदा करावी. जेणे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल,” असे दाभाडे म्हणाले आहेत.
अधिक वाचा –
– Breaking! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्ला तलावात युवकांचे जलसमाधी आंदोलन
– ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मावळ तालुक्यातही मराठा आंदोलकांकडून आमरण उपोषण सुरु
– दिवाळीनिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप