मुंबई पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचा खोपोली पोलिस स्टेशन हद्दीत (दि. 31 ऑक्टो.) भीषण अपघात झाला आहे. पुणे दिशेने रुग्ण महिलेला घेऊन चाललेल्या रुग्णवाहिकेला खोपोलीहून एकप्रेस वेवर उतरल्यावर आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पटकन गाडी रिव्हर्स घेतली आणि गाडीतील सर्व माणसे गाडी बाहेर उतरले. एव्हाना मदतीला पोलिस आणि बचाव यंत्रणा दाखल झाल्या होत्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्यातच गाडीत असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला आणि गाडीच्या चिंधड्या झाल्या. हा मलबा साधारण 200 मीटर अंतरावर उडाला आणि पसरला. याच वेळी तिथे उभे असलेले एपीआय आणि अन्य सहकारी मात्र सुदैवाने बचावले. परंतू, पोलिस वाहन (दुचाकी) जळून खाक झाली. तसेच, रुग्णवाहिका देखील जळून खाक झाली. ( an ambulance terrible accident on mumbai pune highway in khopoli police station limits )
- रुग्णवाहिकेतील महिला रुग्ण, नातेवाईक ( एकूण 6) एक महिला डॉक्टर आणि चालक असेल एकूण 9 जण रुग्णवाहिकेत होते. रुग्ण महिला अत्यवस्थ असल्याने तिला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर गुलबर्गा कर्नाटक येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला. रुग्णवाहिकेचा स्फोट होण्यापूर्वी सर्वजण ॲम्बुलन्सच्या बाहेर आले. परंतू, अत्यवस्थ असवस्थेत असलेली महिला पेशंट ( निलाबाई भगवान कवालदार वय-74 रा. ऐरोली नवी मुंबई ) मात्र दुर्दैवाने मृत पावली. अन्य सर्वजन सुखरुप आहेत.
वाहतूक पोलीस यंत्रणेचे API योगेश भोसले आणि सर्व कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल राऊत, API हरेश काळसेकर आणि कर्मचारी, देवदूत यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी होते. ॲम्बुलन्स मधील ऑक्सिजन सिलेंडरचे स्पोट झाले, त्यामध्ये सुदैवाने पोलीस कर्मचारी आणि बचाव दलातील सदस्य बचावले मात्र एका पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन (दुचाकी) जळून खाक झाली आहे.
अधिक वाचा –
– ‘मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत’ – मुख्यमंत्री
– किसान युनियनचा एल्गार! श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर दिनांक 3 नोव्हेंबरला मोर्चा
– जबरदस्त कामगिरी! पुणे जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, एकूण 504 आरोपींना अटक