कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त, महाराष्ट्रातील शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा आज (दि. 31 ऑक्टो) झिरो टू हिरो ( zero to hero award ) या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कोकण संस्था काम करत असताना अनेक कर्तृत्ववान महिला संस्थेच्या संपर्कात आल्या त्यात महिला शेतकरी, सरपंच, ग्रामसेवक, महिला उद्योजिका, शिक्षिका, आरोग्यसेविका, डॉक्टर अशा अनेक क्षेत्रातील महिलांचा यात समावेश आहे.
मावळ तालुक्यातील प्रतिभा विठ्ठल कुंभार त्यातील एक असून घरातील स्त्री सक्षम झाली तर पूर्ण घर विकसित होते, या स्वानुभवामुळे गावातील अनेक महिलांना स्वयंरोजगार देऊन सक्षम करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रतिभा कुंभार यांना डॉ. अमेय देसाई आणि सिनेकलाकार दीपा परब – चौधरी यांच्या हस्ते “झिरो टू हिरो” या पुरस्काराने काल मुंबईत सन्मानित करण्यात आले. दादर मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक सिनेकलाकार रीलस्टार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या पुरस्कारप्रसंगी कुंभार म्हणाल्या, “कोकण कला व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील एक नामांकित संस्था असून ती सनाथ, निराधार गरीब, गरजू कातकरी, आदिवासी, झोपडपट्टीतील मुले असलेल्या गरीब गरजूंसाठी आणि विशेषतः सनाथ मुलांसाठी चांगल्या पद्धतीने काम करते आहे आणि या संस्थेमुळे मावळ भागात अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजची सेवा करत आहेत आणि माझ्या कार्याचा गौरव केल्याबद्दल मी संस्थेचे आभार मानते. ( pratibha vitthal kumbhar from maval taluka honored with zero to hero award )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवून लुटमार करणारे तीनजण ताब्यात । Maval Crime
– ‘मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत’ – मुख्यमंत्री
– किसान युनियनचा एल्गार! श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर दिनांक 3 नोव्हेंबरला मोर्चा