रात्रीच्या वेळी रहदारी नसलेल्या रस्त्यावर अडवून लूटमार केली जाते. परंतु मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरच लूटमार झाल्याचा प्रकार घडला आहे. कामशेतच्या हद्दीत रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ट्रक चालकाला अडवून मारहाण करत लुटण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुंबई- पुणे एक्सेप्रेसवेवर घडलेल्या या धक्कादायक प्रकारात ट्रकवर दगडफेक करत अडवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. शुभम दत्ता होजगे, धिरजी लहु कडू, प्रथमेश जितेंद्र कालेकर या तीन आरोपींना अटक केली आहे.
ट्रक चालकाला मारहाण करत त्याला लुटण्याचा प्रकार घडला होता. 20 ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास बौर गावच्या हद्दीत मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे रोडने मुंबई लेनवरून जात असताना तीन अज्ञात इसमांनी ट्रक अडकून ट्रकच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान केले. दरम्यान गाडीमध्ये चढून तक्रारदार यांना दगडाने डोक्यात मारून दुखापत केली तसेच तक्रार यांचा मुलगा गौरव याला कानाखाली मारून गाडी थांबवून तक्रारदार यांचे ताब्यातील चार हजार पाचशे रूपये रोख, चार हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, चार हजार पाचशे रुपये किंमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण तेरा हजार रुपये किंमतीचा माल जबरीने चोरी करून चोरून नेला होता.
अधिक वाचा –
– जबरदस्त कामगिरी! पुणे जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, एकूण 504 आरोपींना अटक
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील आणखीन एका गावात पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’, ‘आरक्षणाच्या निर्णयाशिवाय कुणी गावात आला तर…’
– Breaking! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्ला तलावात युवकांचे जलसमाधी आंदोलन