गुरुवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी वसूबारस होती. वसूबारस या दिवासापासून दिवाळी खऱ्या अर्थाने सुरु झाली असे म्हणतात. त्यामुळेच या दिवसापासून दारात आणि देवघरात पणत्या लावून दिपावलीची सुरुवात केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आणि पूर्वीपासूनच जेव्हा किल्ले-गड यांवर वस्ती होती, तेव्हा गडांवर दिवाळीत दीप लावले जायचे. परंतू, आता गडावर वस्ती असत नाही. त्यामुळे गडांवर पूर्वीप्रमाणे दिवाळी साजरी होत नाही. मात्र, छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्यांवर आणि गड किल्ल्यांवरील मंदिरांत अलिकडे अनेक शिवभक्तांकडून दरवर्षी दिपावलीचा दिपोत्सव केला जातो. ( Dipotsav 2023 on Fort Lohgad Maval Taluka )
View this post on Instagram
यंदा देखील मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात असलेल्या किल्ले लोहगडावर दिवाळीचा पहिला दिवा वसूबारस रोजी लावण्यात आला. यावेळी शेकडो पणत्यांनी किल्ले लोहगडाचा परिसर उजळून निघाला होता. समस्त हिंदु बांधव गडदुर्ग सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून किल्ले लोहगडावर गुरुवारी दिपोत्सव सोहळा करण्यात आला. शेकडे स्वयंसेवक आणि शिवभक्तांनी पणत्या लावून किल्ले लोहगडाचा परिसर प्रकाशमान केला. हे दृश्य नजरेत साठवून ठेवावे असे होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धनगर समाजाच्या उन्नतीसाठी योजना राबवणार, राज्यातील निर्यातीला वेग देणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय
– महत्वाची बातमी! मावळ तालुका काँग्रेस (आय) उपाध्यक्षपदी राजू फलके यांची नियुक्ती
– छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची वडगाव मावळ पोलिसांकडे तक्रार