पिंपरी चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक संदीप वाघोरे यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूकीचे रणशिंग फुकल्याचे दिसत आहे. पिंपरी शहरातील कार्यक्षम नेतृत्व आणि एक विचारी, कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांचा लौकिक आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी चांगली छाप पाडली आहे. परंतू आता येत्या लोकसभा निवडणूकीत ते उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशात दिवाळी सणाचे औचित्य साधून संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांनी दिवाळी भेटचे वाटप केल्याने आगामी लोकसभेसाठीचे हे रणशिंगे फुंकल्याची चर्चा होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघोरे यांचे मावळमधील विश्वासू सचिन बिडकर यांनी संदीप वाघोरे युवा मंचच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात वाघोरे यांच्या दिवाळी भेट संचचे वाटप केले. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता, ‘संदिपभाऊ यांनी मावळ लोकसभेतील जनतेला स्नेह भेट दिली असून भविष्यात मावळ लोकसभेला विकासाचा नवीन सुर्योदय होणार आहे” असे सचिन बिडकर यांनी म्हटले. आगामी लोकसभेसाठी वाघोरे यांनी निवडणूक लढवावी आणि अजितदादा, उद्धव ठाकरे, फडणवीस यांच्याबरोबर चर्चा सुरू असल्याचीही चर्चा मतदारसंघात होत आहे. परंतू भाजपाच्या तिकीटावर नगरसेवक झालेले वाघोरे लोकसभा निवडणूकीवेळी काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. ( Maval Lok Sabha Election 2024 PCMC Corporator Sandeep Waghore discussed as candidate )
अधिक वाचा –
– गतवर्षी 24 रुपये, यंदा इंद्रायणी भाताला किती दर मिळणार? आमदार सुनिल शेळकेंच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष
– शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली