भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवा वंचितांसाठी’ या अभियान अंतर्गत बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) मावळ विधानसभा मतदार संघातील अहिरवडे येथील कातकरी वस्तीवरील बांधवांना दिवाळी फराळ वाटप करून दिपावली सण साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी उत्तर अध्यक्ष किरण राक्षे, संभाजी शिंदे तसेच चिखलसे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून अहिरवडे येथील आदिवासी नागरिकांना दिवाळी निमित्ताने भेट वस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, प्रशांत ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, गिरीष खेर, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष किरण राक्षे, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल भेगडे, चिखलसे ग्रामपंचायत सदस्य सचिन काजळे, संभाजी शिंदे, दत्ताभाऊ निम्हण, राजेंद्र सातकर, दिलीप गावडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Maval BJP celebrated Diwali with tribal families at Ahirwade Village )
अधिक वाचा –
– दिवाळी भेटच्या निमित्ताने फुंकले निवडणूकीचे रणशिंग? मावळ लोकसभेसाठी ‘या’ नगरसेवकाचे नाव चर्चेत
– सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न; पिंपलोळी गावातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी
– बालदिन विशेष : ‘मुलांना फुलायचंय अन् पालकांनी फुलवायचंय’, संवादातून उलगडले मुलांचे भावविश्व । Children’s Day 2023