वंचित बहुजन आघाडी कार्यालय वडगाव मावळ या ठिकाणी नवनिर्वाचित वंचित बहुजन युवा आघाडी मावळ तालुका आणि वंचित बहुजन युवा आघाडी लोणावळा शहर या दोन्ही कार्यकारिणी मधील सर्व पदाधिकारी आणि सत्कार समारंभ पार पडला. वंंचित बहुजन आघाडी पक्षाच्या युवा आघाडी मावळ तालुका अध्यक्षपदी संदीप कदम यांची, तर करण भालेराव यांची लोणावळा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये ऋषीकेश नांगरे-पाटील – पुणे जिल्हा निरीक्षक तथा युवा आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य, विशाल गवळी – सोलापूर जिल्हा निरीक्षक तथा युवा आघाडी, भारत गुप्ते – संपर्कप्रमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सीमा भालेसेन, पुणे जिल्हा महासचिव जयश्री सदावर्ते, मावळ तालुका महासचिव वृषाली वीर गुजर, मावळ तालुका उपाध्यक्षा मनीषा ओव्हाळ आदी यावेळी उपस्थित होते. ( Vanchit Bahujan Yuva Aghadi New Executive Committee Of Maval Taluka and Lonavla City )
कार्यक्रमाची प्रस्तावना वंचित बहुजन युवा आघाडी मावळ तालुका प्रवक्ते जिजाभाऊ सोनवणे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोधनकार सागर वाघमारे यांनी केले, आभार प्रदर्शन मनीषा ओव्हाळ यांनी केले. यावेळी दिनेश भाऊ गवई तळेगाव शहराध्यक्ष, पवन भाऊ ऊधागे – वडगाव शहर उपाध्यक्ष,रविकांत रणपिसे – बौद्ध महासभा, किसन गायकवाड ज्येष्ठ कार्यकर्ते, अनिल गायकवाड ज्येष्ठ कार्यकर्ते, नानासाहेब मोटे, लहू वाघमारे, शिंदे साहेब, लहुजी लोखंडे, संदीप कदम, नितीन निकाळजे, सूर्यकांत कदम संपर्कप्रमुख मावळ तालुका, सपना कदम महिला आघाडी तिकोना, रविना कदम महिला आघाडी तिकोना, वैशाली उदागे महिला आघाडी वडगाव आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न; पिंपलोळी गावातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी
– बालदिन विशेष : ‘मुलांना फुलायचंय अन् पालकांनी फुलवायचंय’, संवादातून उलगडले मुलांचे भावविश्व । Children’s Day 2023
– गतवर्षी 24 रुपये, यंदा इंद्रायणी भाताला किती दर मिळणार? आमदार सुनिल शेळकेंच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष