Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर, प्रभाग क्रमांक १ परिसरातील ” गोखले ले आऊट ” भागातील चार जोडरस्त्यांचे डांबरीकरणाचे काम आज (दि. १५ जून ) पूर्ण झाले.

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आणि वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने, तसेच नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, नगरसेविका पुनम विकी भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हे काम अखेर मार्गी लागले आहे.
दरम्यान, या भागातील अनेक इमारतीतील सांडपाणी उघड्यावर येत असल्याने परिसरात अस्वछता निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे कामे देखील पूर्ण करण्यात आले आहे.
नगराध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, नगरसेविका पुनम भोसले यांनी स्वतः प्रभागात चालू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. तसेच, आमदार महोदय, नगराध्यक्षा आणि स्थानिक नगरसेवकांचे आभार मानले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

