मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अनिकेत घुले मित्रपरिवार यांच्या वतीने रिल्स स्टार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेतेपदाचा मान आदित्यराजे मराठे यांच्या ‘मावळचा जलनायक’ या रिल्सने मिळविला. आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला एक लाख अकरा हजार, उपविजेते अभी मोरे यांच्या हॉस्पिटल मदतीच्या सत्य घटनेवर आधारित रिल्सला 77 हजार, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळालेल्या प्रजुल ढाकोळ यांच्या हॉस्पिटल मदत रिल्सला 55 हजार, चतुर्थ क्रमांक विजेते किशोर तांदळे यांना 44 हजार, पाचव्या क्रमांकाचे विजेते अजित घावटे यांना 33 हजार, सहाव्या क्रमांकाचे विजेते गणेश चोरघे यांना 22 हजार, सातव्या क्रमांकाचे विजेते राहुल पाटील यांना अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. तसेच मोस्ट लाईक्स आणि व्हिव्हज हे विशेष पारितोषिक गणेश चोरघे यांना देण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्यापैंकी तीस जणांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. युवकांच्या करियरसाठी केलेल्या कार्याबद्दल काव्या करियर अकॅडमीचे संस्थापक शंकर हुरसाळे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. ( Reels Star Competition By Aniket Ghule Mitra Parivar Occasion Of MLA Sunil Shelke Birthday )
युवा नेते अनिकेत घुले यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सांप्रदायिक क्षेत्रातील संग्रामबापू भंडारे, कबीर आत्तार, सोपान कण्हेरकर, अमलेश जवळकर, मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, प्रा. विठ्ठल कांगणे, वास्तुशास्त्र तज्ञ आनंद पिंपळकर, मधुकर वाघोले, देवाभाऊ गायकवाड, अतुल मराठे, प्रकाश धिंडले, चांडाळ चौकटीच्या करामती या मालिकेतील कलाकार सुभाषराव मदने, रामभाऊ जगताप, रोहित पाटील, अभिनेत्री मोनालिसा बागल, अश्विनी बागल, हिंदवी पाटील, कावेरी घंगाळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रसारमाध्यम तंत्रज्ञान विशेषज्ञ सुमन नलावडे आणि ज्येष्ठ पत्रकार आमिर खान यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश डोके तर सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.
अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांची धडाकेबाज कारवाई! कुसगावातील जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, 7 जण ताब्यात
– काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या 200 कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात मावळ भाजपाचे आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन
– शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना मिळणार आकर्षक भेट