भाजपा मावळ विधानसभा आणि विद्यार्थी आघाडी युवा वॉरियर्स आयोजित मतदार नोंदणी अभियानाला व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा व विद्यार्थी आघाडी युवा वॉरियर्स यांच्या वतीने व्ही.पी.एस. महाविद्यालय लोणावळा येथे मावळ नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि लोणावळा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदार नोंदणी करून घेतली. महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आभार मानले. ( BJP New Voter Registration Campaign Spontaneous response by VPS college students Lonavla )
यावेळी रविंद्र भेगडे यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, प्राचार्य यु. ए. महेंद्रकर, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड, सचिन येवले, शुभम मानकामे, विजया वाळुंज, हर्षल होगले, अभिजीत नाटक, प्रणेश नेवाळे, प्रथमेश पालेकर, अश्विनी जगदाळे, भगवती वाळुंज, मुक्ता गव्हाणे, पद्मा संपत, कृष्णा शर्मा यांच्यासह लोणावळा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या महिला भगिनी आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली परिसरातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग टीमचे साहसी रेस्क्यू ऑपरेशन
– ‘विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा’ – माजी मंत्री बाळा भेगडे
– धक्कादायक! खोपोली पोलिसांकडून 218 कोटीपेक्षा अधिक किमतीचे 174.5 किलो अं’मली पदार्थ जप्त