व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली परिसरातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग टीमचे साहसी रेस्क्यू ऑपरेशन

ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली परिसरात कुंडात महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) रोजी घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 14, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Plus-Valley-Tamhini-Ghat

Photo Courtesy : Team Dainik Maval


ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली परिसरात कुंडात महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) रोजी घडली. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. पथकातील स्वयंसेवकांनी कुंडात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह रात्री उशीरा अथक प्रयत्नांनी बाहेर काढला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रोहन विरेश लोणी (वय वर्षे 21 मुळ रा. सोलापूर, शिक्षणानिमित्त पुणे) हा मित्रांबरोबर ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली इथे फिरायला आला होता. अवघड ठिकाणी खाली उतरून पाण्याच्या कुंडात ही मुले पोहायला उतरली. पोहताना दमछाक झाल्याने रोहन कुंडातील पाण्यात बुडाला. रोहन बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याबरोबर असलेले मित्र घाबरले. त्यांनी या घटनेची माहिती पौड पोलिसांना दिली. पौड पोलिसांनी या घटनेची माहिती लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला दिली आणि त्यांना मदतीसाठा पाचारण केले. ( Youth Died After Drowning In Kund at Plus Valley Tamhini Ghat Mulshi Search Operation By Shivdurg Team Lonavla )

प्लस व्हॅली जाण्यासाठी बरीच पायपीट आहे. मोठमोठे दगडगोटे, तीव्र उतार अशा ठिकाणी जाणे – येणे किंवा फोटो काढणे सोपे आहे. पण एखाद्या जखमी व्यक्तीला किंवा मृत व्यक्तीला बाहेर घेऊन येणे कठीण आहे. दुपारी साडे चार वाजता शिवदुर्ग टीम घटनास्थळी पोहोचली. पाण्यातून बॉडी शोधून, बाहेर काढून पॅक करण्यासाठी वेळ गेला संध्याकाळी सहा वाजता परतीचा प्रवास चालू केला. अंधारात खडतर प्रवास करुन रात्री साडे नऊ वाजता बॉडी वर काढली गेली.

आपत्ती व्यवस्थापन संस्था मुळशीचे प्रमोद बलकवडे, मानगाव आपत्ती व्यवस्थापनाचे शेलार मामा, पौड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, वनखात्याचे कर्मचारी, अभयारण्य अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक संस्था मावळची टीम सचिन गायकवाड, महेश मसने, दिव्येश मुनी, अशोक उंबरे, सुनिल गायकवाड, योगेश उंबरे, प्रिंन्स बैठा, सागर कुंभार, योगेश दळवी, दुर्वेश साठे, अनिल आंद्रे आणि रमेश कुंभार हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

अधिक वाचा –
– काले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता कालेकर आणि नामदेव कालेकर बिनविरोध
– दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! मावळ तालुक्याला मिळाले मोठे गिफ्ट, ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी तब्बल 333 कोटींचा निधी
– हिवाळी अधिवेशनातून मावळ तालुक्याला मिळणार मोठी गुड न्यूज! मावळवासियांची उत्कंठा शिगेला, कोणती घोषणा होणार?


dainik maval jahirat

Previous Post

‘विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा’ – माजी मंत्री बाळा भेगडे

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ पुन्हा ब्लॉक; ‘या’ काळात मुंबई लेन राहणार बंद, पाहा वाहतुकीचे नियोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mumbai-pune-expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ पुन्हा ब्लॉक; 'या' काळात मुंबई लेन राहणार बंद, पाहा वाहतुकीचे नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.