मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने ‘संकल्प दूरदृष्टीचा – सर्वांगीण विकासाचा’ ह्या दुसऱ्या टप्प्यातील ‘गावनिहाय संवाद दौरा’ येत्या सोमवारपासून (दिनांक 18 डिसेंबर) सुरु होत आहे. सोमवार आणि मंगळवार असा दोन दिवस हा गावभेट दौरा असणार आहे. ह्या अभियानातील पहिल्या टप्प्यात आंदर मावळातील 46 गावे आणि वाडीवस्त्यांवर राष्ट्रवादीने नागरिकांशी सुसंवाद साधला होता. त्यानंतर आता दुसर्या टप्प्यात नाणे मावळात दौरा होत असून इथेही समान कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘संकल्प दूरदृष्टीचा, सर्वांगीण विकासाचा’ या अभियानांतर्गत गावनिहाय संवाद दौरा आयोजित केला आहे. निमित्ताने कार्यकर्ते आणि जनतेशी सुसंवाद साधता येतो. आंदर मावळातील दौऱ्यात 46 गावात विकासावर चर्चा झाली. दोन गावात राजकीय परस्पर चर्चा झाली. आंदर मावळातील दौऱ्यातील समस्या, कार्यकर्ते आणि नागरिक यांची मते या बाबतचा अहवाल अजितदादांना आणि आमदार सुनिल शेळकेंना दिला होता. या अहवालातील नागरिकांनी सुचवलेल्या कामांना आणि प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शेळके यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला, हेच या दौऱ्याचे फलित आहे.” – गणेश खांडगे (राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष)
दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यात माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, माजी सभापती बाबूराव वायकर, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन घोटकुले, माजी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, ज्येष्ठ विधीतज्ञ अँड. नामदेवराव दाभाडे यांच्यासह मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी होणार आहेत. ( Village Visit Dialogue Tour By Maval Taluka Nationalist Congress Party Ajit Pawar Sunil Shleke )
असा असेल गावभेट दौरा – टप्पा दुसरा
– सोमवारी, दिनांक 18 डिसेंबर सकाळी 10 वाजता : कांब्रे (ना.मा.) येथील गावभेटीत कांब्रे, करंजगाव, गोवित्री, उकसान, पाले, वळवंडी, वडवली येथीस कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.
– सोमवारी, दिनांक 18 डिसेंबर दुपारी 12 वाजता : भाजगाव येथे कोळवाडी, भाजगाव, शिरदे, सोमवडी, थोरण, जांभवली, उंबरवाडी येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाई.
– सोमवारी, दिनांक 18 डिसेंबर दुपारी 3 वाजता : सांगिसे इथे वाडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, मुंढावरे येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.
– मंगळवारी, दिनांक 19 डिसेंबर सकाळी 10 वाजता : ताजे इथे खामशेत, पाथरगाव, पिंपळोली, ताजे, बोरज, मुंढावरे, पाटण येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.
– मंगळवारी, दिनांक 19 डिसेंबर दुपारी 12 वाजता : कार्ला इथे टाकवे खुर्द, शिलाटणे, वेहेरगाव, दहिवली, कार्ला, मळवली, वाकसई येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.
– – मंगळवारी, दिनांक 19 डिसेंबर दुपारी 3 वाजता : कुणे (ना. मा.) इथे वरसोली, कुणे ना.मा. राजमाची येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.
याच दिवशी सायंकाळी 5 वाजता कुसगाव बुद्रुक इथे कुसगाव बुद्रुक, औंढे, औंढोली, भाजे, देवले, डोंगरगाव, ओळकाईवाडी येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल. या संपूर्ण दौऱ्याच्या नियोजनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आघाडीवर आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यातील गाभेट दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास गणेश खांडगे यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– ‘रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डीपीआर करा, वंदे भारतसह विविध एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा द्या’ – खासदार श्रीरंग बारणे
– भाजपाच्या नवमतदार नोंदणी अभियानाला व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Lonavla News
– लोणावळ्यात युवक राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर; 102 बाटल्या रक्त संकलित