व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमध्ये ‘दादा गट’ ॲक्टिव्ह मोडवर! सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील ‘गावभेट संवाद दौऱ्याची’ सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने 'संकल्प दूरदृष्टीचा - सर्वांगीण विकासाचा' ह्या दुसऱ्या टप्प्यातील 'गावनिहाय संवाद दौरा' येत्या सोमवारपासून (दिनांक 18 डिसेंबर) सुरु होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 15, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-Taluka-NCP

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने ‘संकल्प दूरदृष्टीचा – सर्वांगीण विकासाचा’ ह्या दुसऱ्या टप्प्यातील ‘गावनिहाय संवाद दौरा’ येत्या सोमवारपासून (दिनांक 18 डिसेंबर) सुरु होत आहे. सोमवार आणि मंगळवार असा दोन दिवस हा गावभेट दौरा असणार आहे. ह्या अभियानातील पहिल्या टप्प्यात आंदर मावळातील 46 गावे आणि वाडीवस्त्यांवर राष्ट्रवादीने नागरिकांशी सुसंवाद साधला होता. त्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात नाणे मावळात दौरा होत असून इथेही समान कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

“राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘संकल्प दूरदृष्टीचा, सर्वांगीण विकासाचा’ या अभियानांतर्गत गावनिहाय संवाद दौरा आयोजित केला आहे. निमित्ताने कार्यकर्ते आणि जनतेशी सुसंवाद साधता येतो. आंदर मावळातील दौऱ्यात 46 गावात विकासावर चर्चा झाली. दोन गावात राजकीय परस्पर चर्चा झाली. आंदर मावळातील दौऱ्यातील समस्या, कार्यकर्ते आणि नागरिक यांची मते या बाबतचा अहवाल अजितदादांना आणि आमदार सुनिल शेळकेंना दिला होता. या अहवालातील नागरिकांनी सुचवलेल्या कामांना आणि प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शेळके यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला, हेच या दौऱ्याचे फलित आहे.” – गणेश खांडगे (राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष)

दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यात माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, माजी सभापती बाबूराव वायकर, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन घोटकुले, माजी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, ज्येष्ठ विधीतज्ञ अँड. नामदेवराव दाभाडे यांच्यासह मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी होणार आहेत. ( Village Visit Dialogue Tour By Maval Taluka Nationalist Congress Party Ajit Pawar Sunil Shleke )

असा असेल गावभेट दौरा – टप्पा दुसरा

– सोमवारी, दिनांक 18 डिसेंबर सकाळी 10 वाजता : कांब्रे (ना.मा.) येथील गावभेटीत कांब्रे, करंजगाव, गोवित्री, उकसान, पाले, वळवंडी, वडवली येथीस कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.

– सोमवारी, दिनांक 18 डिसेंबर दुपारी 12 वाजता : भाजगाव येथे कोळवाडी, भाजगाव, शिरदे, सोमवडी, थोरण, जांभवली, उंबरवाडी येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाई.

– सोमवारी, दिनांक 18 डिसेंबर दुपारी 3 वाजता : सांगिसे इथे वाडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, मुंढावरे येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.

– मंगळवारी, दिनांक 19 डिसेंबर सकाळी 10 वाजता : ताजे इथे खामशेत, पाथरगाव, पिंपळोली, ताजे, बोरज, मुंढावरे, पाटण येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.

– मंगळवारी, दिनांक 19 डिसेंबर दुपारी 12 वाजता : कार्ला इथे टाकवे खुर्द, शिलाटणे, वेहेरगाव, दहिवली, कार्ला, मळवली, वाकसई येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.

– – मंगळवारी, दिनांक 19 डिसेंबर दुपारी 3 वाजता : कुणे (ना. मा.) इथे वरसोली, कुणे ना.मा. राजमाची येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल.

याच दिवशी सायंकाळी 5 वाजता कुसगाव बुद्रुक इथे कुसगाव बुद्रुक, औंढे, औंढोली, भाजे, देवले, डोंगरगाव, ओळकाईवाडी येथील कार्यकर्ते आणि नागरिक यांची भेट घेतली जाईल. या संपूर्ण दौऱ्याच्या नियोजनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आघाडीवर आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यातील गाभेट दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास गणेश खांडगे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– ‘रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डीपीआर करा, वंदे भारतसह विविध एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा द्या’ – खासदार श्रीरंग बारणे
– भाजपाच्या नवमतदार नोंदणी अभियानाला व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Lonavla News
– लोणावळ्यात युवक राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर; 102 बाटल्या रक्त संकलित


dainik maval jahirat

Previous Post

मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानुसार खंडाळा इथे मराठा समाजाकडून बेमुदत साखळी उपोषण; महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद

Next Post

तळेगाव एमआयडीसीतील जेसीबी कंपनीत मोठी चोरी! लाखोंचे पार्ट लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

तळेगाव एमआयडीसीतील जेसीबी कंपनीत मोठी चोरी! लाखोंचे पार्ट लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.