‘मावळ तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. कामात दिरंगाई केली जात आहे,’ असे सांगत याबाबत आमदार सुनिल शेळकेंनी अधिवेशनात लक्षवेधी सुचना मांडून सरकारचे लक्ष वेधले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील 157 गाव-वाडी वस्तीवर 114 योजनांद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे. यापैकी फक्त 27 योजना पुर्ण झाल्या आहेत. तर 87 योजना अर्धवट अवस्थेत आहेत आणि 60 योजनांच्या कामांची मुदत संपली आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली गेली. नवीन केलेले रस्ते खोदुन कामे केली गेली, त्या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही, असा आरोप आमदार शेळकेंनी केली. ( MLA Sunil Shelke attention in Vidhansabha regarding poor work of water supply schemes in Maval )
तसेच, थर्ड पार्टी ऑडिट केलेल्या अहवालात काय त्रुटी आढळल्या हे सांगावे. चुकीचे काम झालेल्या, भ्रष्टाचार झालेल्या पाणी योजनांची चौकशी होणार का? चौकशी किती दिवसात करणार? ज्या ठिकाणी चुकीचे काम झाले आहे, त्या ठिकाणी तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून पारदर्शक चौकशी करणार का? असा प्रश्न आमदार शेळकेंनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, थर्ड पार्टी ऑडिटद्वारे काही योजनांची चौकशी केली आहे. त्याचा अहवाल माझ्याकडे प्राप्त आहे. काही ठिकाणी त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील. आमदारांनी गावनिहाय जे काम योग्य नाही ते सांगावे, त्या ठिकाणी चौकशी केली जाईल, असे आश्वासित केले.
अधिक वाचा –
– तळेगाव एमआयडीसीतील जेसीबी कंपनीत मोठी चोरी! लाखोंचे पार्ट लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
– मावळमध्ये ‘दादा गट’ ॲक्टिव्ह मोडवर! सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील ‘गावभेट संवाद दौऱ्याची’ सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
– मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानुसार खंडाळा इथे मराठा समाजाकडून बेमुदत साखळी उपोषण; महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद