सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार देहूगाव हद्दीतील सर्व मराठी पाट्या नसलेल्या दुकाने आणि आस्थापना यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्री श्रेत्र देहू शहर यांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे 25 नोव्हेंबरच्या आत सर्व पाट्या मराठीत होणे अपेक्षित होते. परंतू, काही ठिकाणी अद्यापही मराठी भाषेत पाट्या दिसत नाही, त्यामुळे तिथे कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन मनसे देहू शहर यांच्याकडून देण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्र नवनिर्माण सेना देहू शहर कार्यकारिणीच्या वतीने याबाबत देहू नगरीच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी आणि पोलिस प्रशासन यांना निवदेन देण्यात आले आहे. यावेळी मनसे शहराध्यक्ष बालाजी झोंबाडे, उपाध्यक्ष सार्थक काळोखे, शहर संघटक गणेश परदेशी, अजय कांबळे, दत्ता बंडगर, काशीराम जोग, रुषिकेश पिंजण, तसेच वाहतुक सेना अध्यक्ष शुशांत गायकर आदी उपस्थित होते. ( Dehu MNS gave letter to administration for signboards on shops should be in marathi language )
देहू शहर हद्दीतील काही दुकाने आणि आस्थापना याठिकाणी मराठीत पाट्या नसल्याचे निदर्शनास आल्याने मनसेने आवाज उठवला आहे. ज्या ठिकाणी मराठीत पाट्या नाहीत, तिथे भाषेला प्राधान्य देत मराठीत पाट्या लागल्या पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठी भाषेतच सर्व दुकानांच्या पाट्या व्हायला पाहिजेत. त्यामुळे जिथे मराठीत पाट्या नसतील त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देहू शहर मनसेकडून करण्यात आलीये.
…कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा!
‘स्थानिक प्रशासनाने तातडीने मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानदारांवर आणि आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पुढील 15 दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देहू शहर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या प्रशासनाच्या आणि सर्व दुकानदारांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल,’ अशा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! ‘तळेगाव-चाकण-शिक्रापूर’ दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच केंद्र सरकारची मंजुरी मिळणार
– नवं संकट! कोरोना जेएन-वन व्हेरिएंट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन
– स्तुत्य उपक्रम! कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही आणि 200 पुस्तके भेट