वडगाव शहराजवळील वडगाव फाटा येथील हॉटेल ज्योतीर्लिंग जवळील एका ऑटो गॅरेजमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून तब्बल 71,305 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रघुनाथ ननावरे ( वडगाव मावळ पोलीस स्टेशन ) यांनी फिर्याद दिलीये, त्यानुसार आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम सन 1887 च्या कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ताब्यात घेण्यात आलेले संशयित आरोपी;
1) रविंद्र मोरेश्वर हवालदार (वय 81 वर्षे, रा. चावडी चौक वडगाव) 2) राम चंद्रपाल बहादुर (वय 30 वर्ष) 3) राजेंद्र कामताप्रसाद कुमार (वय 30 वर्षे) 4) रकिश लालजी विश्वकर्मा (वय 28 वर्षे) तिघेही राहणार मोरया कॉलनी वडगाव, 5) शंकर उर्फ सुनिल मारुती कुराडे (वय 45 वर्षे, रा. मोरया कॉलनी वडगाव) 6) यल्लप्पा बसप्पा मुर्ती (वय 45 वर्षे, रा. माळवाडी-चाकण एम.आय.डी.सी. रोड) 7) विजयकुमार मारुती बनसोडे (वय 30 वर्षे, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) ( police action on illegal gambling den near vadgaon maval city 7 people arrested )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 22 डिसेंबर) रोजी सायंकाळी पोलिसांनी वडगाव फाटा येथील संबंधित ठिकाणी छापा टाकला असला, वरील आरोपी क्रमांक 1 ते 7 हे तिथे हे तिथे कल्याण मटका जुगार खेळताना आढळून आले. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विविध प्रकारचा कब्बल 71 हजार 305 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार काळे करत आहेत, अशी माहिती वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून देण्यात आली आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक कुमार कदम, सपोनि राऊळ, पोसई चव्हाण, पोसई भोसले, पोहवा/बनसोडे, पोहवा/कवडे आणि वडगाव पोलीस स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांनी केली.
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत नवीन समर्थ विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण संपन्न
– नागरिकांनो, नियमांचे पालन करा..! नाताळ सण, नववर्ष आणि शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहरात पोलिसांकडून रुट मार्च
– ‘वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे तोच कायम ठेवा’, बाजारपेठेतील घरमालकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन