हक्काचा वीकएंड शनिवार, रविवार आणि नाताळ ( christmas ) सणाचा सोमवार, अशा सलग सुट्ट्यांमुळे नोकरदार वर्ग भलताच खूश झाला होता. सलग तीन दिवस मिळालेल्या सुट्ट्यांच्या गिफ्टमुळे नववर्षाच्या स्वागताचीही मजा याचवेळी घ्यायची, असा प्लॅन अनेकांनी बनवला होता. त्यामुळे घरदार सोडून तीन दिवस निसर्गाच्या सानिध्यात कुठे तरी जावं या विचाराने घाटाखालची जनता घाटावर आणि घाटवरील जनता घाटाखाली जायचा बेत आखून मार्गस्थ झाली. पण हा असा प्लॅन करणाऱ्यांची संख्या इतक्या पटींने होती की सुट्ट्यांची लाट आणि त्या पाठोपाठ वाहनांचीही लाट एकाचवेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ( mumbai pune expressway ) आली. आणि सगळाच घोळ झाला. वाहतूक कोंडीने प्रत्येकाच्याच प्लॅनची पुरती वाट लावली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शनिवारी (दि. 23 डिसेंबर) जुन्या नव्या अशा सर्वच मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी ( traffic jam ) झाल्याचे पाहायला मिळाले. लोणावळा (lonavala ) खोपोली (khopoli ) ही दोन तोंडावरची दोन शहरे तर दिवसभर वाहनांच्या पाँम-पाँम आवाजाने बेजार झाली होती. तिथल्या गल्ली बोळातही गाड्या शिरत होत्या. तर दुसरीकडे खंडाळा घाटातील ( khandala ) अनेक स्पॉट वाहतूक कोंडीने खच्चाखच भरले होते. सायमाळ, शिंग्रोबा मंदीर, वाय पॉइंट, सर्व्हिस पॉइंट अशा ठिकाणी तुफान वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तासंतास प्रवासी वाहनात अडकून होते. यात वाहनांच्या क्लच प्लेट निकामी होणे, प्रवासी वाहन अडकने, बेशिस्त वाहनचालकांनी वाहने वाकडीतिकडी चालवणे यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गहरी बनली.
- महामार्गावरील वाहतूक यंत्रणा, पोलिस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि अन्य सामाजिक सेवा संस्थानी या परिस्थितीत सुयोग्य नियोजन केले होते. परंतू वाहनांची संख्या वाढल्याने संबंधित यंत्रणांचीही दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. तरीही जागोजागी वाहतूक कोंडी सुटावी यासाठी दिवसभर उन डोक्यावर घेत ते रात्रीच्या गडद अंधारात ही यंत्रणा काम करत होती. वाहतूक कोंडी मिटवण्यासोबतच प्रवाशांना पाणी अन्नाचीही मदत ही सर्व लोकं करत होती. हे सर्व चित्र या ट्रॅफिक जॅमच्या संकटात तोंडावर समाधान आणणारं होतं.
रविवारीही (दि. 24 डिसेंबर) सकाळच्या सत्रात महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. मॅकेनिकल पॉइंट भागात ऑईल लिकेजमुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली होती. परंतू, मदत यंत्रणा प्रत्यक्ष ठिकाणी वेळेत पोहोचून त्यांनी रस्ता स्वच्छ करुन वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. एकंदरित पुढील दोन दिवस ते तीन दिवस महामार्गावर हे वाहतूक कोंडीचे संकट असेच कायम राहणार, असे चित्र दिसत आहे. ( christmas weekend consecutive holidays traffic jam in lonavala khandala borghat area on mumbai pune highway )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती
– पवना विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न; ‘विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी’ – संतोष खांडगे
– मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार, अंतरवाली सराटीपासून पायी चालत जाणार