ख्रिसमस येताच रस्त्यावर लालरंगाची टोपी आणी सांताक्लॉज मुखवटे विक्रीस ठेवलेले दिसतात. अनेक मुले ही लालटोपी आणी पांढऱ्या दाढीचा मुखवटा घालून आनंदाने सांताक्लॅाज् बनतात. सांताक्लॉज् आणी ख्रिसमस हे आज समीकरणच झाले आहे. आपण ज्याला सांताक्लॉज म्हणून ओळखतो त्याचे खरे नाव “सेंटनिकोलस” आहे. जरी सांताक्लॉजचे नाव येशू ख्रिस्ताशी संबंधित आहे, तरी बायबलमध्ये पाहिले तर आणि सांताक्लॉज यांच्यात कोणताही संबंध नाही. हे पूर्णपणे काल्पनिक पात्र आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सेंट निकोल सचा जन्म तिसऱ्या शतकात उत्तर ध्रुवावर असलेल्या मायरा येथील एका गरीब कुटुंबात झाला. म्हणजे येशू ख्रिस्ता नंतर सुमारे 280 वर्षानंतर. निकोलस अनाथ होते. त्यामुळे त्यांनी प्रभु येशूलाच आपले आई वडिल मानले. ते मोठा होऊन ख्रिश्चन धर्माचे बिशप झाले. लहान पण गरीबीत गेल्यामुळे गरीबांच्या इच्छा आणी भावना यांची त्यांना चांगलीच जाणीव होती. या जाणीवे तुनच त्यांनी ज्यांना स्वतःच्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत, अशा गरीब आणि इच्छा पूर्ण करू न शकणारे गरिब लोकांना मदत करणे हा त्यांनी आपला धर्म मानला. ( Christmas Special Lord Jesus Christ and Santa Claus Read History and Information in Marathi )
गरजूंना आणि मुलांना भेट वस्तू द्यायला त्यांना नेहमीच आवडे. मुलांना भेट वस्तु मिळाल्यावर झालेला आनंद पाहून त्यांनाही आनंद होई. परंतु अनोळखी मुले ही भेट स्वीकारत नसत म्हणून ते आपली ओळख न सांगता तो मध्यरात्रीच्या वेळी बाहेर जाऊन मुलांना आणि गरजूंना भेट वस्तू देत असे. आपली ओळख कुणाला दिसावी किंवा कळू नये असे त्यांना वाटू लागले आणी त्यातूनच सांताक्लॉजचा जन्म झाला. वेष बदलून ते मुले झोपल्यावरच घरातून बाहेर पडत असे आणि त्यांना भेट वस्तू द्यायचे.
- सांताक्लॉज येवुन भेट देवुन जातो हा समज निर्माण झाला. संत निकोलस यांच्या जीवनातील अनेक कथा आहेत, ज्या खूप लोकप्रिय आहेत. ज्या मध्ये त्यांनी गरजू लोकांना मदत केली आणि त्यांना रातोरात श्रीमंत केले. मुले ख्रिसमसच्या रात्री त्यांचे मोजे बाहेर लटकवतात या आशेने की त्यांना सकाळी त्यांच्या आवडत्या भेटवस्तू मिळतील. फ्रान्समध्ये, लाल रंगाचे शूज शेकोटी वर टांगले जातात ज्या मध्ये सांता येतो आणि भेटवस्तू टाकतो. ही प्रथा वर्षानु वर्षे सुरू आहे. सांता रेडिएटर्स वर चालतो, म्हणूनच फ्रान्सची मुले रेडिएटर्स साठी त्यांच्या शूजमध्ये गाजर ठेवतात.
आजही मुलांच्या मनातील सांतावरील विश्वास कमी झालेला नाही. सर्व मुलांसमोर सांताक्लॉजच्या रूपात अवतरलेल्या निकोलसया व्यक्तीचे नाव येशू आणि मदर मेरी यांच्या नावाने अत्यंत आदराने घेतले जाते. असे म्हटले जाते की निकोलसची उदारता पाहिल्या नंतर इस 1200 पासून 6 डिसेंबर हा फ्रान्समध्ये निकोलस डे म्हणून साजरा केला जातो. कारण तो दिवस निकोलसचा मृत्यू झाला होता.
सँडब्लॉम नावाच्या कलाकाराने 35 वर्षे सांता म्हणून कोकाकोलाची जाहिरात केली. तो लाल आणि पांढऱ्या कपड्यात आला आणि त्याने कोकाकोलाची जाहिरात केली आणि लोकांना सांताचा हा नवीन अवतार खूप आवडला, जो आजपर्यंत स्वीकारला जातो आणि सांता त्या रूपात लक्षात राहतो. पण खरा सांता म्हणजे निकोलस आज पर्यंत कोणीही पाहिला नव्हता. ना त्याला कोणी ओळखले होते. त्या मुळे सांताचे हे नवीन रूप पाहून प्रत्येक जण तो सांता असल्याचा अंदाज बांधतो आणि आनंदाने नाचतो. हळूहळू, ख्रिसमस आणि सांता यांच्यात घट्ट नाते निर्माण होत गेले आणि ते मुलांमध्ये प्रसिद्ध झाले. आज सांता प्रत्येकासाठी भेटवस्तू आणेल ही भावना सर्वाच्या मनात खोलवर रुजलेली आहे.
लेखन – अजित दि. देशपांडे
अधिक वाचा –
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल, सरपंचपदी सोनाली जगताप यांचा दणदणीत विजय!
– सलग सुट्ट्यांची आली लाट, पण वाहतूक कोंडीने लावली वाट! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ट्राफिक जॅमने प्रवासी हैराण
– ‘पीएमआरडीए’चे अभियंता अजिंक्य पवार यांची वराळे गावाला भेट; आमदार सुनिल शेळकेंनी केली होती सुचना