व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचा निर्णय! पवना आणि इंद्रायणी नद्या उगमापासून स्वच्छ होणार । Amrit Yojana

पवना आणि इंद्रायणी नद्या अलीकडच्या काळात प्रदूषित झाल्या आहेत. दोन्ही नद्या उगमापासून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत कामे केली जाणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 30, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
PCMC-News

Photo Courtesy : Team MP Shrirang Barne


पवना आणि इंद्रायणी नद्या अलीकडच्या काळात प्रदूषित झाल्या आहेत. दोन्ही नद्या उगमापासून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत कामे केली जाणार आहेत. नदी सुधार प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे गेला आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर तत्काळ कामांना सुरुवात होईल. नद्यांमध्ये प्रदूषित पाणी जाऊ नये यासाठी इंद्रायणी व पवना नदी काठच्या सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे ( Shrirang Barne ) यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पवना ( Pavana ) आणि इंद्रायणी ( Indrayani ) नद्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी आमदार अश्विनी जगताप, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, महापालिका आणि पीएमआरडीएचे संबंधित अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. ( Important News Pavana and Indrayani Rivers Will Be Clean Under Amrit Yojana Maval Pune )

पवना आणि इंद्रायणी नदी उगमापासून स्वच्छ करणे आणि प्रदूषण मुक्त करणे या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून काम सुरु आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. अमृत योजनेअंतर्गत याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत खासदार श्रीरंग बारणे सातत्याने केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा 577.16 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑगस्ट 2023 मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला. राज्याने यास मान्यता दिली असून आता हा अहवाल केंद्राच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे (एनआरसीडी) सादर करण्यात आला आहे. एनआरसीडी कडून 60 टक्के अनुदान आणि राज्य शासन 40 टक्के अनुदान देणार आहे.

इंद्रायणी नदीच्या तीरावर एकूण 48 गावांमधील पाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्याबाबत नियोजन केले जात आहे. यामध्ये लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी नगरपरिषदा, वडगाव, देहू नगरपंचायती, देहू कटक मंडळ, 15 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या तीन ग्रामपंचायती आणि इतर 39 ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे. पवना नदीच्या किनारी देखील ज्या ग्रामपंचायतींचे पाणी पवना नदीत मिसळत आहे, तिथे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत.याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन वर्षात या दोन्ही नद्या शंभर टक्के प्रदूषणमुक्त होतील. वारकऱ्यांचे शुद्ध इंद्रायणीचे स्वप्न निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीरंग बारणे पुढे म्हणाले, ज्या नगरपालिकांचे आणि गावांचे पाणी नदीत मिसळत आहे त्या गावांमध्ये पूर्ण क्षमतेने एसटीपी उभारण्यात येणार आहेत. यामुळे नदीन मिसळणारे सांडपाणी प्रक्रिया होऊनच नदीत सोडले जाईल. याचा राज्य शासनाकडून केंद्राकडे प्रस्ताव गेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या सहकार्याने पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. ( Important News Pavana and Indrayani Rivers Will Be Clean Under Amrit Yojana Maval Pune )

इथे उभारणार एसटीपी प्लांट –

इंद्रायणी नदीच्या काठावर लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, देहू नगरपंचायत, वडगाव नगरपंचायत, देहू कटक मंडळ, कुसगाव बुद्रुक, कामशेत-खडकाळे, इंदुरी ही 15 हजार पेक्षा अधिक लोकसंख्येची गावे, कार्ला, वरसोली, कान्हेवाडी तर्फे चाकण, येलवडी, आंबी, जांभूळ, कान्हे, गोळेगाव, सोळू, तुळापुर, मरकळ, नाणे, टाकवे बुद्रुक, सांगुर्डी, वडगाव शिंदे या 15 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांत एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत. उर्वरित 24 गावांमध्ये इन सेतू नाला ट्रीटमेंटचा वापर करून मैला शुद्धीकरण करण्याचे काम केले जाणार आहे.

अधिक वाचा –
– नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडताय? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर येण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा
– बाळाभाऊ खासदार होणारच..! माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या वाढदिवसानिमित्त मावळ मतदारसंघात समर्थकांची जोरदार बॅनरबाजी
– तळेगाव एमआयडीसी पोलिसांचा जांबवडे गावात छापा; बेकायदा गावठी दारूचा साठा आणि विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा पोलिस इन ॲक्शन मोड! वेहेरगावातील मटका अड्ड्यावर धडक कारवाई, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime

Next Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग! Maval Politics

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-taluka-ncp

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग! Maval Politics

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.