व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आढावा बैठक; इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा – मंत्री दीपक केसरकर

इंद्रायणी नदीचे सांस्कृतिक महत्व लक्षात घेता नदीत जाणारे दूषित, प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखावे आणि सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 27, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
indrayani-river

file image


इंद्रायणी नदीचे सांस्कृतिक महत्व लक्षात घेता नदीत जाणारे दूषित, प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखावे आणि सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे आयोजित लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार उमा खापरे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

केसरकर म्हणाले, प्रक्रिया न केलेले दूषित पाणी नदीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नवे प्रकल्प उभारताना जुने प्रकल्पही सुरूच राहतील याकडे लक्ष द्यावे. नद्यांचे पाणी शुद्ध राहावे यावर मुख्यमंत्री महोदयांचा भर आहे. नमामि चंद्रभागा प्रकल्पाच्यादृष्टीने इंद्रायणीसोबतच मुळा-मुठा नदीतील प्रदूषण रोखण्याबाबतही विचार करावा लागेल. ( Immediately stop contaminated water going into Indrayani River review meeting on Indrayani Pollution )

नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करावा. नाल्यांमध्ये जाणारे प्रक्रिया न केलेले पाणी थांबविण्यासाठीही उपाययोजना करावी. गृहनिर्माण संस्थांद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी व्यवस्थापनावर प्राधान्याने लक्ष द्यावे. ग्रामीण भागात शोषखड्डे तयार करण्यावर भर द्यावा. नगरपालिकेने या विषयासाठी स्वतंत्र पथक तयार करावे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाईपर्यंत प्राथमिक उपाययोजनांद्वारे नद्यांमध्ये जाणारे दूषित पाणी रोखावे, असे निर्देश केसरकर यांनी दिले.

विविध विभागांनी समन्वयाने उपाययोजना करून नदीत जाणारे दूषित पाणी रोखण्याचे उपाय योजावेत, असे आवाहन श्रीमती खापरे यांनी केले. ढाकणे म्हणाले, 20 हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रातील प्रकल्पाला मान्यता देताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला असल्याची खात्री करून घ्यावी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीतील उद्योगांद्वारे दूषित पाणी प्रक्रिया न करता नदीत जाताना आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी पीएमआरडीएच्यावतीने इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी सादरीकारणाद्वारे माहिती देण्यात आली.

अधिक वाचा –
– हलगीच्या कडकडाटात वडगावमधील खंडोबा मंदिर चौकात भाविकांकडून गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे स्वागत
– वडगाव मावळ पोलिसांचा टाकवे गावात छापा! अवैधरित्या गांजा साठवणूक करणाऱ्या दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– पुन्हा होणार विठू नामाचा जागर! कामशेत इथे 1 जानेवारीपासून कीर्तन महोत्सव, ‘हे’ प्रसिद्ध कीर्तनकार करणार कीर्तनसेवा


Previous Post

श्री फडणवीस आता बनले डॉक्टर फडणवीस! जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट

Next Post

धाडसाचं कौतूक, धैर्याला सॅल्यूट.! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सर्पमित्रांकडून जाळीत अडकलेल्या विषारी नागाला जीवदान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
life-to-cobra-snake

धाडसाचं कौतूक, धैर्याला सॅल्यूट.! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सर्पमित्रांकडून जाळीत अडकलेल्या विषारी नागाला जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.