व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धाडसाचं कौतूक, धैर्याला सॅल्यूट.! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सर्पमित्रांकडून जाळीत अडकलेल्या विषारी नागाला जीवदान

नाग सापाला त्या जाळीतून सोडवताना खूप मोठी रिस्क होती. कारण तो बऱ्याच वेळापासून जाळीत अडकलेला असल्याने खूप अग्रेसिव्ह झाला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 27, 2023
in महाराष्ट्र
life-to-cobra-snake

Photo Courtesy : Team Dainik Maval


रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील चौक गावात कुंपणाला लावण्यासाठी असलेल्या आणि अडगळीत ठेवलेल्या जाळीत साप अडकल्याची माहिती “स्नेक रेस्क्युअर्स खोपोली – खालापूर” या संस्थेचे सदस्य सर्पमित्र रोहिदास म्हसणे यांना मिळाली. असे प्रसंग नेहमीच हाताळणाऱ्या रोहिदास हे त्या सापाला जाळीतून सोडून सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यासाठी तिथे गेले असता त्यांच्या निदर्शनास आले की, तो साधासुधा साप नसून पूर्ण वाढ झालेला नाग जातीचा विषारी साप होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

अर्थातच नाग सापाला त्या जाळीतून सोडवताना खूप मोठी रिस्क होती. कारण तो बऱ्याच वेळापासून जाळीत अडकलेला असल्याने खूप अग्रेसिव्ह झाला होता. त्याला रिलीज करण्याचे काम एकट्याचे नव्हते यासाठी त्यांनी नवीन मोरे आणि सुनील पुरी या सर्पमित्रांना मदतीसाठी बोलावून घेतले. त्या तिघांनी मिळून अत्यंत कुशलतेने त्या नागाला कोणतीही इजा न होता व्यवस्थित जाळ्यातून सोडवण्यास सुरुवात केली. ते थरारक दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे येत होते. ( snake friends gave life to cobra snake with extreme courage khalapur taluka raigad district news )

ते तिघेही सर्पमित्र एकाग्रतेने या ऑपरेशनला सक्सेस करून मोकळे झाले. जाळीमध्ये जेरबंद झालेल्या विषारी नागाला रोहिदास, नवीन आणि सुनील हे वाचवण्यासाठी आल्याचे काही घेणे देणे नसल्यासारखा तो त्यांच्यावर वारंवार जीवघेणा अटॅक करत होता. मात्र याकडे दुर्लक्ष न करता तिघांनी स्वतःचा बचाव करत शिताफिने आणि सुरक्षेची साधने वापरून त्याला जीवदान देण्याचे कर्तव्य पार पाडले. या रेस्कू ऑपरेशनमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे नवीन मोरे आणि सुनील पुरी हे “अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे” फ्रंटलाईन वर्कर देखील आहेत.

अधिक वाचा –
– तळेगावातील मंत्रा सिटीत स्थानिक रिक्षा व्यावसायिकांच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या नव्या रिक्षा स्टँडचे लोकार्पण
– हलगीच्या कडकडाटात वडगावमधील खंडोबा मंदिर चौकात भाविकांकडून गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे स्वागत
– वडगाव मावळ पोलिसांचा टाकवे गावात छापा! अवैधरित्या गांजा साठवणूक करणाऱ्या दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त


dainik maval jahirat

Previous Post

इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आढावा बैठक; इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा – मंत्री दीपक केसरकर

Next Post

महत्वाची बातमी! कोर्टाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य, शेकडो मराठा उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
EWS-Reservation-maharashtra

महत्वाची बातमी! कोर्टाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य, शेकडो मराठा उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.