व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी! कोर्टाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य, शेकडो मराठा उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा

न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य केल्याने मराठा समाजासह अन्य विविध भरती प्रक्रियांमध्ये रखडलेल्या शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 27, 2023
in महाराष्ट्र
EWS-Reservation-maharashtra

Photo Courtesy : FB / CMOMaharashtra


आर्थिक दुर्बल घटक -ईडब्ल्युएसच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. त्यामुळे उच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य केल्याने मराठा समाजासह अन्य विविध भरती प्रक्रियांमध्ये रखडलेल्या शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर या उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

“साहेब, तुम्ही आमचा विश्वास सार्थ ठरवला. हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे.” अशा शब्दांमध्ये एमपीएससी आणि अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनीही या भावनांचा स्वीकार करतानाच, या सर्व उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ( High Court Accepted EWS Reservation )

उच्च न्यायालयाच्या निकालामुळे एमपीएससीच्या वर्ग-1 व 2 च्या तसेच सरळसेवा भरतीतील उमेदवारांच्या प्रलंबित नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. त्यात,

  1. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – 2019 – 94 उमेदवार
  2. महाराष्ट्र वनसेवा – 2019 – 10
  3. कर सहायक – 2019 – 12
  4. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – 2020 – 153
  5. पोलीस उपनिरीक्षक – 2020 – 65
  6. वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट – अ – 7
  7. इतर सरळसेवा भरती ;
  8. कनिष्ठ अभियंता – 2019 – जलसंपदा विभाग – 66
  9. दंत शल्यचिकित्सक, पुणे महानगरपालिका – 1

अशा रितीने 276 मराठा व 132 इतर उमेदवार अशा एकूण 408 उमेदवारांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रसंगी राजेंद्र कोंढरे, संजीव भोर – पाटील, अंकुश कदम, रघुनाथ चित्रे – पाटील आदी उपस्थित होते.

मराठा समाजाचे एसईबीसी आरक्षण मा.सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर एमपीएससी उत्तीर्ण एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस पर्याय राज्य सरकारने उपलब्ध करून दिला होता. मात्र हा निर्णय मॅट न्यायालयाने रद्द केल्याने एमपीएससी उत्तीर्ण मराठा, ईडब्ल्यूएस उमेदवारांच्या नियुक्त्या दीर्घकाळ… https://t.co/CO3u5qJGjf

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 26, 2023

अधिक वाचा –
– श्री फडणवीस आता बनले डॉक्टर फडणवीस! जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट
– तळेगावातील मंत्रा सिटीत स्थानिक रिक्षा व्यावसायिकांच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या नव्या रिक्षा स्टँडचे लोकार्पण
– हलगीच्या कडकडाटात वडगावमधील खंडोबा मंदिर चौकात भाविकांकडून गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे स्वागत


dainik maval jahirat

Previous Post

धाडसाचं कौतूक, धैर्याला सॅल्यूट.! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सर्पमित्रांकडून जाळीत अडकलेल्या विषारी नागाला जीवदान

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मावळचे माजी आमदार स्व. दिगंबर (दादा) भेगडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Digambar-Bhegde-memorial

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मावळचे माजी आमदार स्व. दिगंबर (दादा) भेगडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.