व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाळाभाऊ खासदार होणारच..! माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या वाढदिवसानिमित्त मावळ मतदारसंघात समर्थकांची जोरदार बॅनरबाजी

माजी राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे मावळ विधानसभेचे दोन वेळचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा दिनांक 31 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 29, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
bala-bhegade-birthday-banner-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


माजी राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे मावळ विधानसभेचे दोन वेळचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा दिनांक 31 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांचा यंदाचा वाढदिवस हा लोकसभा निवडणूकीपूर्वीच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे बाळा भेगडेंच्या समर्थकांनी शुभेच्छांची बॅनरबाजी करताना निवडणूकीचा धागा पकडल्याचे दिसत आहे. संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात बाळा भेगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर त्यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय. भेगडे समर्थकांच्या या फ्लेक्सबाजीमुळे सध्याचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे मात्र टेन्शन वाढले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गटाचे) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे खासदारकीची हॅट्रीक करण्यासाठी पुन्हा एकदा मावळ लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तशी इच्छा त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. दुसरीकडे मावळ विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनीही ह्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा सांगितला आहे. शिवसेना ठाकरे गट, मनसे ह्या पक्षांनीही मावळ लोकसभेसाठी तयारी सुरु केलीये. तर, मिशन 40+ च्या निमित्ताने भाजपानेही मागील अनेक महिन्यांपासून मावळ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय. ही सर्व पार्श्वभूमी पाहता महायुती आणि महाविकासआघाडी दोन्हीकडे मावळ लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. ( Maval Lok Sabha Constituency Election 2024 Former MLA State Minister Bala Bhegde Birthday Banner 31st December )

  • ह्या सर्व परिस्थितीत भाजपाचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघात अनेक फ्लेक्सवर त्यांना उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय. मावळ लोकसभेत असलेल्या सहापैकी तीन मतदारसंघ घाटाखाली आहेत, तिथेही भाजपाकडून अनेक नेते इच्छुक आहेत. भाजपाकडून या मतदारसंघात इच्छुक असणाऱ्यांची संख्या पाहता आणि विद्यमान खासदारांचा उमेदवारीचा निश्चय पाहता, मावळ लोकसभेवरून महायुतीत वाद होण्याची चिन्ह जास्त दिसतायेत.

एकूणच मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कुणाला मिळणार? कोण कोण बंड करणार? निवडणूकीचं गणित कसं असेल? हे आगामी काळात दिसेलच, पण सध्या तरी बाळा भेगडे यांच्या भावी खासदारकीच्या फलकामुळे खासदार बारणेंचे टेन्शन वाढवल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दादा गट आणि साहेब गट, शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट यासह आता भाजपा, मनसे यांनीही मावळ लोकसभेसाठी तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरु असून पारडे जड असणाऱ्या उमेदवाराचा शोध घेतला जातोय. त्यामुळे मावळ लोकसभेत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अटितटीची किंवा प्रबळ अपक्ष उमेदवार असल्यास तिरंगी चौरंगी अशी तुल्यबळ लढत होऊ शकते, हे निश्चित.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ‘पाऊणे दोन कोटींची चूक’, प्रकरण हलक्यात न घेता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
– श्रीविठ्ठल मंदिर संस्थान तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन
– बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल आणि जीवंत काडतूसासह रंगेहात अटक; लोणावळा पोलिसांची कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव एमआयडीसी पोलिसांचा जांबवडे गावात छापा; बेकायदा गावठी दारूचा साठा आणि विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Next Post

नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडताय? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर येण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडताय? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर येण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.