व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल आणि जीवंत काडतूसासह रंगेहात अटक; लोणावळा पोलिसांची कारवाई

लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 28, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
lonavala-gramin-police

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल आणि अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या अधिपत्याखाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यानुसार, बुधवार (दिनांक 26 डिसेंबर 2023) रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांचे विश्वासातील बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक व्यक्ती स्वत:च्या जवळ विनापरवाना पिस्तूल घेवून फिरत असून तो वरसोली येथील कचरा डेपोच्या परिसरात येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांना मिळाले बातमीचा आशय आणि छापा कारवाईचा प्लॅन सांगून कारवाईचे आदेश दिले. ( Man arrested with pistol and live cartridge by Lonavala Rural Police )

त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले हे तात्काळ त्यांच्या सोबत असणारे स्टाफसह भारत गॅस गोडावून वरसोली इथे रवाना झाले. तिथे बातमीतील वर्णनाचा एक व्यक्ती उभा असलेला दिसला. त्याला पोलीसांची चाहूल लागताच तो तिथून पळून जावू लागला, त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या पथकाने अतिशय कुशल रितीने सदर व्यक्तीचा पाठलाग करुन त्याला काही क्षणात त्याब्यात घेतले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत राऊंड असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा माल हस्तगत करुन जप्त केला आहे. सदर बाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक आणि किशोर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार विजयकुमार मुंढे, पोलीस हवालदार नितीन कदम, पोलीस हवालदार संतोष शेळके, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक भुषण कदम, पोलीस नाईक किशोर पवार, पोलीस अंमलदार संजयदादा पंडीत, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे, पोलीस अंमलदार त्रषीकेश पंचरास यांनी सहभाग घेतला. तपासात सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आणि आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा –
– हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची आता खैर नाही! वडगाव पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई
– मावळ लोकसभा लढवण्यासाठी अजितदादांचा ‘विश्वासू नेता’ राष्ट्रवादी सोडणार? ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? वाचा सविस्तर
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मावळचे माजी आमदार स्व. दिगंबर (दादा) भेगडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण!


dainik maval jahirat

Previous Post

मावळातील ‘दादा’ गटाची ताकद दिसणार! राष्ट्रवादीकडून आंदर मावळ विभागात शुक्रवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन

Next Post

श्रीविठ्ठल मंदिर संस्थान तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vitthal-Mandir-Talegaon-Dabhade

श्रीविठ्ठल मंदिर संस्थान तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval ST service get boost with Jijau Bus five new smart buses inaugurated at Talegaon depot

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ ; तळेगाव आगारात पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण

September 1, 2026
Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.