महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्या आदेशानुसार मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक पदी विजय जाधव यांची नेमणूक झाली आहे. त्या निमित्ताने मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी निरीक्षक विजय जाधव यांचा तालुका कमिटीच्या वतीने सत्कार करून बैठकीचे आयोजन केले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी मावळ तालुका काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती बाबत सविस्तर आढावा जाधव यांनी घेतला. तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी पक्षाने आदेशित केलेल्या बुथ कमिट्या मंडल कमिटी ग्राम कमिटी बी आलो नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड अध्यक्ष सर्व फ्रंटल सेल विभाग व तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये रिक्त असणारे तालुका शहर सर्व फ्रंटल सेलच्या नेमणुका करण्याबाबतच्या सूचना निरीक्षक विजय जाधव यांनी केल्या असून प्रलंबित सर्व नेमणुका करण्याबाबत तालुकाध्यक्ष मोहोळ यांनी सांगितले.
- मावळ तालुका काँग्रेस पक्ष गावोगावी पोहोचला असून पक्ष संघटन बांधणी साठी सर्व पदाधिकारी तळागाळापर्यंत पोहोचल्याची माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रोहिदास वाळुंज यांनी दिली. मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी युवकांचे मोठे संघटन बांधून प्रत्येक घटकातील युवकांना सहभागी करून घेतली असल्याची माहिती दिली.
यावेळी पुणे जिल्हा असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संग्राम जाधव, मावळ तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा हिरे, तालुका संपर्कप्रमुख राजीव शिंदे, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष असलम शेख, तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष सहादु आरडे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष संभाजी लेंडघर, किसान सेलचे तालुकाध्यक्ष भारत दळवी, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष गफूर भाई शेख, तालुका सरचिटणीस रामदास साठे, सचिव गौतम केदारी, संघर्ष समिती अध्यक्ष एकनाथ येवले, तळेगाव स्टेशनचे कार्याध्यक्ष योगेश पारगे, तालुका सरचिटणीस महादू खांदवे, अनिशभाई तांबोळी, वडगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण माहूर तालुका उपाध्यक्ष राजेश फलके, माजी सरपंच सोमनाथ कालेकर, माजी सरपंच सदाशिव सातकर, प्रतापराव हिरे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! 1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा कोणकोणत्या केल्यात गाड्या रद्द, वाचा संपूर्ण यादी । Pune Lonavala Local
– पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आणि मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान