पुणे : तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला दोनशे पैकी दोनशे चौदा गुण मिळाले असून, आजवरच्या शैक्षणिक इतिहासातील हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला. या भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज सरकारला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सत्तेतून खाली खेचण्याची गरज असल्याचेही रोहन सुरवसे पाटील म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेल्या ट्वीटद्वारे ही माहिती समोर आली आहे. एकाच विद्यार्थ्याला वनरक्षक परीक्षेत चोपन्न गुण मिळाले आहेत. तर, तलाठी भरती परीक्षेत दोनशे पैकी दोनशे चौदा गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असोत, की सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असोत. या परीक्षांतील पारदर्शकता पूर्णपणे संपली असून, अहोरात्र मेहनत करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम शिंदे-फडणवीस-पवार सरकार करीत आहे.”
“ह्या नतदृष्ट सत्ताधाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नसून, वशिलेबाजी आणि पैसे घेऊन सरकारी पदे पूर्णपणे विकली जात असल्याची शक्यता आहे. संपूर्ण तलाठी भरती परीक्षेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी. तसेच तलाठी भरती आणि वनरक्षक भरती रद्द करण्यात यावी,” अशी मागणीही सुरवसे-पाटील यांनी केली आहे. ( maharashtra talathi recruitment scam explain in marathi )
सरकारकडून खुलासा…
तलाठी भरती प्रक्रियेमध्ये 200 पेक्षा अधिकचे गुण काही उमेदवारांना मिळाल्याचं समोर आले. मुळात 200 गुणांचीच परीक्षा असताना अधिक गुण कसे मिळाले? हा मोठा गैरप्रकार आहे. भ्रष्टाचार आहे, अशा पद्धतीचे आरोप रविवारी झाले. त्याबाबत सर्वच माध्यमात बातम्या प्रकाशित झाल्या. काही आमदार, काही मंत्र्यांनी सुद्धा हा गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. प्रत्यक्षात असा कुठलाही गैरप्रकार नसून हे केवळ गैरसमजुतीतून घडलं आहे, असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
200 पेक्षा जास्त गुण मिळण्याचे कारण काय?
सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.
अधिक वाचा –
– पार्थ पवार शिरूरमधून लढणार की मावळमधून? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं… । Ajit Pawar & Parth Pawar
– मोठी बातमी! भुगावजवळील मानस तलावात कारमध्ये आढळला मृतदेह, गाडी तरंगताना दिसल्यावर प्रकार उघडकीस, परिसरात खळबळ । Pune News
– पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही । Maval Lok Sabha