व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात शनिवारी होणार ‘इंद्रायणी नदी आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता’, IPS सत्यसाई कार्तिक यांचे नागरिकांना आवाहन । Lonavala News

26 एप्रिल 2023 रोजी कार्ला (ता.मावळ जि पुणे) येथील ऐतिहासिक एकविरा गड आणि बौद्ध कालीन लेण्यांची स्वछता करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 17, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Pune-Police-Cleanliness-Campaign

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून ‘वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा’ हे गड किल्ले स्वच्छता अभियान माहे एप्रिल 2023 पासून चालू करण्यात आले आहे. 26 एप्रिल 2023 रोजी कार्ला (ता.मावळ जि पुणे) येथील ऐतिहासिक एकविरा गड आणि बौद्ध कालीन लेण्यांची स्वछता करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

सदर अभियानात पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, NCC कॅडेड, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, वकील, पत्रकार, पोलीस पाटील आणि नागरिकांनी सहभागी होते, या अभियानास नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या अभियानामध्ये किल्ले लोहगड, तसेच पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचे लोणावळ्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेले टायगर पॉईंट, भुशी डॅम व किल्ले तिकोना या ठिकाणाची स्वछता करण्यात आली. या स्वच्छता अभियानात 12 टन कचऱ्याचे संकलन करून हा कचरा लोणावळा नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रास सुपूर्त करण्यात आला होता. अशा प्रकारे या अभियानाच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, दारूच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या व इतर कचरा संकलित करण्यात आला. ( Pune Police Varsa Svachhtecha Mavla Shivrayancha Cleanliness Campaign on January 20 In Lonavala )

या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयावर जागृती करण्यासाठी स्वछता अभियान संपल्यानंतर उपस्थितांना पथनाट्य किंवा तज्ञ व्यक्तींच्या मार्फतीने व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, वाहतूक नियमन या सारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करून जनजागृती केली जाते. या स्वछता अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात दि. 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 06:30 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सर्व महापुरुषांचे पुतळे व परिसराची स्वछता तसेच सोमनाथ महादेव मंदिर नांगरगाव, लोणावळा येथील इंद्रायणी नदी पत्रातील जलपर्णी काढून अध्यात्मिक नदी इंद्रायणी नदीची स्वछता करून करण्यात येणार असल्याचे अभियानाचे संकल्पक सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले. या स्वछता अभियानात स्वयंसेवकांचे दोन समूह तयार करून खालील ठिकाणी अभियान राबविण्यात येणार आहे.

1) छ. शिवाजी महाराज चौक, लोणावळा
2) सोमनाथ महादेव मंदिरा जवळील इंद्रायणी नदी पात्र
या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करून स्वछता अभियानासाठी शनिवार दि.20/01/2024 रोजी सकाळी 06:30 वाजता छ. शिवाजी महाराज चौक लोणावळा ता मावळ जि पुणे येथे एकत्रित जमावे असे आवाहन केले आहे.

अधिक वाचा –
– दुर्गम भागातील विद्यार्थी गिरवणार संगणकाचे धडे; कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट । Maval Gramin
– महत्वाचे! मावळ तालुक्यातील 20 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या प्रत्येक गृहप्रकल्पांचे ऑडिट होणार । Maval News
– तळेगाव येथील रुडसेट संस्थेला पशुसंवर्धन विभाग उपायुक्तांची भेट; शेळी-मेंढी पालन शिबिरार्थींना केले मार्गदर्शन । Talegaon Dabhade

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

दुर्गम भागातील विद्यार्थी गिरवणार संगणकाचे धडे; कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट । Maval Gramin

Next Post

बापूसाहेब भेगडेंवर अजित दादांकडून नवी जबाबदारी, थेट राज्य पातळीवर काम करण्याची दिली संधी! । NCP Bapu Bhegade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bapu-Bhegde

बापूसाहेब भेगडेंवर अजित दादांकडून नवी जबाबदारी, थेट राज्य पातळीवर काम करण्याची दिली संधी! । NCP Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
Thousands of fish die in Indrayani River at Dehu serious concerns ahead of Ashadhi Wari

देहूतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू ; आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

June 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.