व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचे! मावळ तालुक्यातील 20 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या प्रत्येक गृहप्रकल्पांचे ऑडिट होणार । Maval News

मावळ तालुक्यातील अनेक गृह प्रकल्पातील नागरिकांना भौतिक सुविधा दिलेल्या नसतानाही पूर्णत्वाचा दाखला मिळतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 16, 2024
in लोकल, पुणे, शहर, शहर
PMRDA-Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


पीएमआरडीए हद्दीमधील गृह प्रकल्पांमध्ये झालेली अनियमितता तसेच या प्रकल्पांद्वारे इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला आमदार सुनिल शेळके यांच्यासह पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, नगरपरिषद प्रशासन अधिकारी पूनम पंडित, नगर रचनाकार सोनाली आहेर, सहाय्यक नगर रचनाकार अजिंक्य पवार तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील अनेक गृह प्रकल्पातील नागरिकांना भौतिक सुविधा दिलेल्या नसतानाही पूर्णत्वाचा दाखला मिळतो. तसेच या गृह प्रकल्पांमधून निघणारे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. याबाबत 16 मार्च 2023 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लक्षवेधी’ मांडून हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आवश्यक नियम व शिफारशी करुन त्याचा सर्वसमावेशक अहवाल शासनास सादर करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या चौथ्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. ( Important News Every housing project with more than 20 flats in Maval taluka will be audited )

दिनांक 16 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत पीएमआरडीए मार्फत मावळ तालुक्यातील 20 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या प्रत्येक गृह प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करुन ऑडिट करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित बिल्डरकडून सोसायटीतील नागरिकांना भौतिक सुविधा (पाणी,वीज,रस्ता,सांडपाणी व्यवस्था इ.) दिल्या आहेत की नाही, याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी पुढील कार्यवाहीसाठी बैठक घेण्यात येणार आहे.

अधिक वाचा –
– ‘आता सरकारला वेळ द्यायचा नाही’ म्हणत मनोज जरांगेंनी सांगितला ‘चलो मुंबई’चा प्लॅन, मावळात ‘इथे’ होणार मुक्काम । Maratha Reservation
– मावळमधील 91 गावात राबवली जाणार प्रधानमंत्री जनमन योजना; कातकरी समाजातील नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे लाभ
– शंकराचार्यांचा अवमान केल्याबद्दल नारायण राणेंचा निषेध, लोणावळ्यात महाविकासआघाडी रस्त्यावर । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव येथील रुडसेट संस्थेला पशुसंवर्धन विभाग उपायुक्तांची भेट; शेळी-मेंढी पालन शिबिरार्थींना केले मार्गदर्शन । Talegaon Dabhade

Next Post

दुर्गम भागातील विद्यार्थी गिरवणार संगणकाचे धडे; कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट । Maval Gramin

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
computer-set-gift

दुर्गम भागातील विद्यार्थी गिरवणार संगणकाचे धडे; कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट । Maval Gramin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.