‘हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय?’ असा प्रश्न विचारून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केल्याचे सांगत, शंकराचार्यांना प्रश्न विचारून अपमान करणाऱ्या नारायण राणेंविरोधात काँग्रेसने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात घोषणा देत त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच, हिंदू धर्माचा आणि शंकाराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणीही करण्यात आली. लोणावळा येथेही काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुण्यात काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील बालगंधर्व चोकात आमदार रविंद्र धंगेरकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे व पदाधिकारी यांनी आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष कल्याण काळे, शोख युनुस व पदाधिकारी यांनी क्रांती चोक येथे आंदोलन केले. लोणावळा शहरात महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होईल. देशभरातून हजारो लोकांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. कारसेवक आणि त्यांचे कुटुंबीय, हजारो साधू-संत, सेलिब्रिटी, क्रीडापटू आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण गेले आहे. असे असले तरी भारतातील चार मठांच्या (पीठ) चार शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल प्रश्न विचारल्यावर बोलताना नारायण राणे यांनी शंकराचार्यांवर टीकेचा सूर लावला होता. ( Protest of Narayan Rane for insulting Shankaracharya Agitation by Mahavikas Aghadi in Lonavala )
अधिक वाचा –
– ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ आणि ‘एचडीएफसी बँक – परिवर्तन’ मार्फत वनविभागाला 140 फॉरेस्ट कीटचे वाटप
– मोरया प्रतिष्ठानच्या पतंग महोत्सवाला वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Vadgaon Maval
– चांदखेडमधील ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप; उपेक्षित घटकाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी आमदार सुनिल शेळकेंकडून विशेष अभियान