संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघावर स्वतः ठाकरे कुटुंबाने देखील लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उ.बा.ठा.) (Shiv Sena) पक्षाकडे राहावा, यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी अनेकदा बैठका घेतल्यात. तसेच अनेक महत्वाच्या पदाधिकारी नेमणूकाही केल्या आहेत. त्यानंतर आता खुद्द आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे मावळ लोकसभेचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात म्हणजे येत्या रविवारी (दि. 21 जानेवारी रोजी) आदित्य ठाकरे हे मावळ तालुक्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे शहरात आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांनी दैनिक मावळला दिलेल्या माहितीनुसार, ‘आदित्य ठाकरे यांचा हा दौरा पुर्वनियोजित आहे. काही दिवसांपूर्वीच मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा लोणावळा शहरात मेळावा झाला होता. तेव्हा पक्षाचे रविंद्र मिर्लेकर, सचिन आहिर हे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी आमदार सचिन आहिर यांनीच रविवारी आदित्य ठाकरे हे मावळ मतदारसंघाच्या दौरा असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मावळ विधानसभेचे संपर्क प्रमुख प्रभाकर पवार आणि उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 20) तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची तळेगाव येथील मेळाव्यानिमित्त नियोजनाची बैठक बोलावण्यात आली आहे.’ असे आशिष ठोंबरे यांनी सांगितले. ( Shiv Sena Aditya Thackeray Maval Lok Sabha Visit Party Rally At Talegaon Dabhade )
तळेगावात होणार शिवसेनेचा जाहीर मेळावा…
आदित्य ठाकरे मावळ तालुक्यात येणार आहेत, ज्यात प्रामुख्याने त्यांच्या उपस्थितीत रविवारी, 21 जानेवारीला सकाळी 11 वाजता ‘शिवसेनेचा जाहीर मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्याचे योग्य नियोजन करण्यासाठी शनिवारी, दि. 20 शिवसेना मावळ तालुका आणि तळेगाव शहरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, भा.वि.सेना, वाहतूक सेना, अवजड वाहतूक सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, शिवसेना अंगीकृत संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जेष्ठ शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. द्वारकाधीश मंगल कार्यालय वडगाव (ता. मावळ) इथे ही बैठक होणार आहे.
अधिक वाचा –
– ’22 जानेवारीला वडगावमधील मांस व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवा’, राष्ट्रवादीकडून पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाला निवेदन
– कामशेत इथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचे पाहुण्यांकडून तोंडभरून कौतूक । Maval News
– कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना : दिनांक 26 ते 28 जानेवारी दरम्यान होणार ‘मावळ फेस्टिवल’ । Maval Festival