व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आई एकविरा देवी देवस्थान कार्ला गडावर भाजपाकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम । Karla Lonavala News

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 19, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
karla-lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरिता आता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना देशभर मंदिर आणि पुजास्थळांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आज, शुक्रवार (दि. 19) रोजी कार्ला येथे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आई एकवीरा देवी मंदिर परिसरात मावळ भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. सर्वांत आधी देवीचे दर्शन घेऊन देवीच्या मुख्य गाभारा आणि पुजास्थान स्वच्छ करून देवीची पुजा करण्यात आली. त्यानंतर देवीचा कळस संपूर्णपणे पाण्याने धुवून स्वच्छ करून अत्तर व गुलाब पाण्याने शुद्धीकरण करण्यात आले. तसेच परिसराची साफसफाई करून स्वछ करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी माझी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरद बुट्टेपाटील, मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, भाजपा तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, प्रांतिक सदस्य जितेंद्र बोत्रे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष पुनम चौधरी, लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, जिल्हा सरचिटणीस संजय रौदळ, लोकसभा समन्वयक कविता हिंगे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड, एकवीरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नवनाथ देशमुख, सागर देवकर, विकास पडवळ;

यांसह भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, तालुका उपाध्यक्ष मधुकर पडवळ, जिल्हा सरचिटणीस सविता गावडे, तालुका सरचिटणीस अभिमन्यु शिंदे, सचिन येवले, दत्तात्रय पडवळ, मंगेश देशमुख, अमोल भेगडे, किसन येवले, गणेश देशमुख, एकनाथ पोटफोडे, सदाशिव देशमुख, मच्छिंद्र केदारी, अरूण भानुसघरे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

“प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. आपली श्रद्धास्थाने म्हणजे मठ, मंदिरे, तीर्थक्षेत्र हे आपले मानबिंदू आहेत. आपण आपल्या मनाच्या शुद्धीसाठी देव दर्शन करतो. त्यामुळे मंदिर परिसराची स्वच्छताची ही देखील तितकीच पवित्र आहे. त्यामुळे माननीय मोदीजींनी याचेच महत्त्व ओळखून प्रभू श्रीरामांच्या आगमनाच्या अनुषंगाने मंदिर परिसर स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही धर्माचे, पंथाचे वा संप्रदायचे असाल; तरी देखील आपल्या पुजास्थळी जाऊन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा.” – जितेंद्र बोत्रे

या स्वच्छता मोहिमेचे आयोजन सायली जितेंद्र बोत्रे (अध्यक्षा – भाजप महिला मोर्चा मावळ), कार्याध्यक्षा सुमित्रा जाधव, सरचिटणीस कल्याणी ठाकर, सरचिटणीस वैशाली ढोरे, सरचिटणीस स्वाती पारीठे आणि महिला मोर्चा मावळ तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते. ( Ekvira Devi Devasthan Karla Gad Cleaning Campaign By BJP Maval Lonavala News )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याला नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभाचा मान! मंडपाचे भूमिपूजन आणि रंगमंच, प्रवेशद्वाराचे नामकरण संपन्न । Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan
– पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाळा भेगडे आणि पदाधिकाऱ्यांकडून तळेगावमधील मंदिरांची स्वच्छता । Talegaon News
– आदित्य ठाकरे रविवारी मावळ तालुक्यात येणार, ‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा जाहीर मेळावा । Aditya Thackeray Maval Visit


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्र सरकारकडून 22 जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर, श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सुट्टी जाहीर

Next Post

मनोज जरांगे पाटील रडले, ‘मी असेन नसेन माहिती नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं’, पत्रकार परिषदेत जरांगे भावूक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-Reservation

मनोज जरांगे पाटील रडले, 'मी असेन नसेन माहिती नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं', पत्रकार परिषदेत जरांगे भावूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.