मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात राज्यभर (Maharashtra) सुरु असलेल्या आंदोलनाचा महत्वाचा टप्पा आजपासून सुरु होत आहे. मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पूर्वघोषणा केल्याप्रमाणे आज (दि. 20) ते आंदोलकांसह अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आंदोलनाच्या पूर्वइतिहासात आजवर बलिदान दिलेल्या मराठा आंदोलकांच्या आठवणींने मनोज जरांगे प्रचंड भावूक (Manoj Jarange Cried) झाल्याचे दिसले. इतकेच नाही तर बोलताना मनोज जरांगे यांच्या डोळ्यात पाणी देखील आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘मी असेन नसेन माहिती नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं’
आजच्या पत्रकार परिषदेतही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणाबाबत आर्त हाक मारली. मी जर आज आंतरवाली सराटी (Antarwali Sarati) सोडली तर आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. सरकारच्या दारात मरण आलं तरीही चालेल. मराठ्यांच्या अनेक पोरांनी आजवर बलिदान दिले आहे. अनेकांची घरं उजाडली आहेत. आता भविष्यात मराठ्यांच्या पोरांवर गुलाल टाकायचा आहे. मराठ्यांची पोरं आयएएस, आयपीएस झाल्याचं बघायचं आहे. त्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसायचं नाही.
‘मनोज जरांगे भावूक’
काल काही आंदोलक भेटायला आले. यावेळी एक आंदोलक आले होते, ज्यांचा घरातील एकुलता एक मुलगा आंदोलनात बलिदान दिलेला होता. त्यांचं घर आज उजाड झालं आहे. त्यांच्या आठवण आली तरीही डोळ्यात पाणी येतं. त्यामुळे आज मी देखील आंतरवाली सराटी ते मुंबई असं चालत जात असतानाच आमरण उपोषण सुरु करणार असल्याबाबत आंदोलकांशी बोलून निर्णय घेणार आहे. तिथेही उपोषण करायचे आहे, मग इथूनच त्याची सुरुवात झाली तर काय. माझी तब्येत आता साथ देत नाही. परंतू आता त्याची फिकीर करून चालणार नाही. मी असेन नसेल पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, असं जरांगे बोलताना म्हणाले आणि त्यांचे डोळेहे हे बोलताना पाणावले.
दरम्यान आजपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे चलो मुंबई आंदोलन सुरु होत असून त्याची सुरुवात अंतरवाली सराटी येथून होणार आहे. मनोज जरांगे हे आज त्यांच्या गावातून आंदोलकांसह मुंबईला निघणार आहेत. मुंबईत पोहोचेपर्यंत मराठ्यांची संख्या ही दोन ते तीन कोटींच्या घरात असेल, असेही त्यांनी सांगितले. ( Maratha Reservation News Manoj Jarange Patil Cried In Press Conference At Antarwali Sarati )
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावोस दौरा प्रचंड यशस्वी; जागतिक आर्थिक परिषदेत तब्बल 3 लाख 53 हजार कोटींहून अधिकचे सामंजस्य करार
– मावळ तालुक्याला नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभाचा मान! मंडपाचे भूमिपूजन आणि रंगमंच, प्रवेशद्वाराचे नामकरण संपन्न । Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan
– पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाळा भेगडे आणि पदाधिकाऱ्यांकडून तळेगावमधील मंदिरांची स्वच्छता । Talegaon News