व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र सरकारकडून 22 जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर, श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सुट्टी जाहीर

सोमवारी, दि. 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यासाठी अनेक विधीमंडळ सदस्यांनी निवेदन दिले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून एकदिवसीय सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. maharashtra government announced public holiday on 22nd january 2024

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 20, 2024
in महाराष्ट्र, मावळकट्टा
maharashtra-cabinet-decision

Photo Courtesy : x / cmo


आयोध्या येथे दिनांक 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या (Ram Lalla Pran Pratishtha) कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून राज्य सरकारकडून (Maharashtra Government) त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करण्यात आली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी हिंदू धर्मियांचे अराध्य प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिर लोकार्पण सोहोळा अयोध्येत होणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम त्यांच्या अयोध्येतील मंदिरात विराजित होणार आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारी, दि. 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यासाठी अनेक विधीमंडळ सदस्यांनी निवेदन दिले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून एकदिवसीय सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

केंद्र सरकारने दिनांक 22 जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सु्ट्टी जाहीर केली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी आणि खाजगी कार्यालये, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल. अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राज्यात सु्टटी जाहीर करण्याची मागणी केली होती. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ( maharashtra government announced public holiday on 22nd january 2024 )

अनेक राज्यांमध्ये अगोदरच सुटी जाहीर –

आयोध्यातील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 22 जानेवारीला राम मंदिर ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. शैक्षणिक संस्थांनाही सुट्टी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्य प्रदेशात 22 जानेवारीला शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात दारू आणि भांग विक्रीच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. गोवा सरकारने 22 जानेवारीला सर्व सरकारी कर्मचारी आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हरियाणा सरकारनेही राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

अधिक वाचा –
– पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाळा भेगडे आणि पदाधिकाऱ्यांकडून तळेगावमधील मंदिरांची स्वच्छता । Talegaon News
– आदित्य ठाकरे रविवारी मावळ तालुक्यात येणार, ‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा जाहीर मेळावा । Aditya Thackeray Maval Visit
– द्रुतगती मार्गावर भल्या पहाटे गंभीर अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू । Mumbai Pune Expressway Accident


dainik maval jahirat

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावोस दौरा प्रचंड यशस्वी; जागतिक आर्थिक परिषदेत तब्बल 3 लाख 53 हजार कोटींहून अधिकचे सामंजस्य करार

Next Post

आई एकविरा देवी देवस्थान कार्ला गडावर भाजपाकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम । Karla Lonavala News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
karla-lonavala

आई एकविरा देवी देवस्थान कार्ला गडावर भाजपाकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम । Karla Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.