व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक : अवैध उमेदवारी अर्ज आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेबाबत महायुतीच्या नेत्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून नुकत्याच झालेल्या छाननीत दोन अर्ज बाद झाले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 5, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
maval-taluka-kharedi-vikri-sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या बाद झालेल्या उमेदवारी अर्जांबाबत दाखल झालेल्या अपिलांवर मंगळवारी (दि. 6 फेब्रुवारी) सुनावणी होणार असल्याची माहिती सहायक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी दिली. मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून नुकत्याच झालेल्या छाननीत दोन अर्ज बाद झाले होते. त्याबाबत कांदळकर यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले आहे. ह्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कांदळकर यांची भेट घेऊन अवैध अर्जांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे मावळ विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले आदी उपस्थित होते. अपिलांबाबत मंगळवारी सुनावणी होणार असून नियमानुसार त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कांदळकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ( Maval Taluka Kharedi Vikri Sangh Nivdnuk Mahayuti Leaders Met Election Officer )

सोमवारी (दि. 5) दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ येथे महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी आणि सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांची भेट घेऊन निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडावी यासंदर्भात चर्चा करून सूचना करण्यात आल्या.

अधिक वाचा –
– मावळच्या शिवली गावातील आदेश आडकरची वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई, माथ्यावर फडकवला भगवा ध्वज!
– ‘राज्यभर नमो महारोजगार मेळावे, मुंबईत मालमत्ता कर वाढ नाही ते पतसंस्थांना मजबूत करणार’, शिंदे सरकारचे मोठे निर्णय, वाचा एका क्लिकवर
– संजोग वाघेरे यांचा बुधवारी पवन मावळ दौरा, गडपूजनाने होणार सुरुवात, पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद । Sanjog Waghere Maval Lok Sabha


Previous Post

‘छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा राज्यभर निषेध करणार’, कुणी केलीये मागणी? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Next Post

महत्वाचे! पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात, जमीन मालकांना आतापर्यंत 2 हजार 625 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Ring-Road

महत्वाचे! पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात, जमीन मालकांना आतापर्यंत 2 हजार 625 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.