यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि. 13) हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी. 15.750 येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
ह्या काळात वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन कि.मी 55.000 वरुन वळवुन मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या जुन्या पुणे-मुंबई मार्गावरुन मार्गस्थ होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. (2 Hours Block On Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway on February 13)
तसेच द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट कि.मी 39.800 येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या जुना पुणे- मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
अधिक वाचा –
– राजकीय भूकंप! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली, आमदारकीचाही राजीनामा, भाजपवासी होणार? जाणून घ्या सविस्तर । Ashok Chavan Resignation
– वडगावात 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा, नवजोडप्यांना मिळणार अनेक वस्तू, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी । Vadgaon Maval
– शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंदर मावळमधील भोयरे गावात आठवडे बाजाराचे उद्धाटन!